Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Satish Shah's Death : मृत्यूआधी अभिनेते सतिश शहाची शेवटची पोस्ट! दिसला आश्चर्यकारक योगायोग

Satish Shah's Death Emotional Coincidence in His Last X Post : "हसून हसून लोटपोट करायला लावणारे, प्रत्येक सिनेमात वेगळी भूमिका साकारणारे, आणि 'साराभाई वर्सेस साराभाई' मालिकेतील 'इंदुवदन साराभाई'च्या रुपात घरोघरी पोहोचलेले... ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या महान कलाकाराने ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला."

"संपूर्ण बॉलिवूड आणि चाहते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असतानाच, सोशल मीडियावरील त्यांच्या एका शेवटच्या पोस्टमुळे एक असा भावनिक आणि दुर्दैवी योगायोग समोर आला आहे, ज्यामुळे चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत."

Satish Shah s Death

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे मुंबईत वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनी निकामी झाल्यामुळे शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २:३० वाजता त्यांचे निधन झाले.

सतिश शाहंच्या कारकीर्दीवर एक नजर

सतिश शाह यांची कारकीर्द बहारदार आहे, एक चांगला आणि सच्चा अभिनेता ते होते, त्यांच्या भुमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहणाऱ्या आहेत. 'जाने भी दो यारो', 'मैं हूं ना', 'ओम शांति ओम', 'हम साथ साथ हैं', 'कल हो ना हो' यांसारख्या २५० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

टीव्ही मालिकांमधील यश

'ये जो है जिंदगी' (ज्यात त्यांनी ५५ एपिसोडमध्ये ५५ वेगवेगळी पात्रे साकारली) आणि 'साराभाई वर्सेस साराभाई' या सिटकॉममधील इंदुवदन साराभाई या भूमिकेमुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले.

शेवटची पोस्ट आणि हृदयद्रावक योगायोग

सतीश शाह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे चाहते आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर त्यांच्या जुन्या पोस्ट्स पाहत असताना, त्यांची अंतिम पोस्ट समोर आली, जी एका विचित्र भावनिक योगायोगामुळे हृदयस्पर्शी ठरली.

सतीश शाह यांची 'ती' शेवटची पोस्ट

सतीश शाह यांची शेवटची पोस्ट दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांना वाहिलेली श्रद्धांजली होती. दुर्दैवी योगायोग असा की, सतीश शाह यांचे निधन किडनी निकामी झाल्यामुळे झाले, तर शम्मी कपूर यांचे निधनही २०११ मध्ये किडनी निकामी झाल्यामुळेच झाले होते.

भावनाविवश संदेश

सतीश शाह यांनी शम्मी कपूर आणि गोविंदासोबतचा एक जुना फोटो शेअर करत लिहिले होते: "वाढदिवस मुबारक प्यारे शम्मी जी. तुम्ही नेहमी माझ्या आसपास असता."

या पोस्टमुळे चाहते भावनाविवश झाले आहेत. ज्याप्रकारे त्यांनी एका महान कलाकाराला त्यांच्या निधनाच्या कारणाशी जुळणाऱ्या कारणाने श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर स्वतःलाही त्याच कारणाने जगाचा निरोप घ्यावा लागला, हा योगायोग त्यांच्या चाहत्यांसाठी एक धक्का ठरला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+