'सतीश शाह यांचा मृत्यू किडनी निकामी झाल्याने नाही', या अभिनेत्याने उघड केले खरे कारण; चाहते अवाक!
Satish shah death-real reason : बॉलिवूडचे दिग्गज आणि 'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह (Satish Shah) यांच्या निधनाने चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुरुवातीच्या वृत्तांमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण किडनी निकामी होणे असे सांगितले जात होते. मात्र, त्यांचे जवळचे आणि साराभाई विरुद्ध साराभाई मालिकेत त्यांच्या मुलाची भुमिका निभवणारे अभिनेता राजेश कुमार याने या वृत्ताचे खंडन केले असून, मृत्यूचे खरे कारण उघड केल्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

'त्या' पोस्टमुळे गैरसमज?
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या निधनानंतर त्यांच्या आरोग्याच्या स्थितीबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. विशेषतः चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये किडनी निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे नमूद केले होते.
'किडनी नाही, तर हृदयविकाराच्या झटक्याने गेला जीव'
वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मालिकेत सतीश शाह यांच्या मुलाची (रोसेश साराभाई) भूमिका साकारणारे अभिनेते राजेश कुमार यांनी बॉलीवूड हंगामाशी बोलताना ही माहिती स्पष्ट केली.
राजेश कुमार यांचे स्पष्टीकरण
"मला हे स्पष्ट करायचे आहे की, सतीश शाह यांच्या जाण्याचे कारण किडनी निकामी होणे नव्हते. हो, त्यांना किडनीची समस्या होती, पण ती नियंत्रणात होती. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart Attack) झाला आहे." असे राजेशकुमार यांनी स्पष्टीकरण दिले.
राजेश कुमार यांनी पुढे सांगितले की, ही घटना अगदी अचानक घडली. सतीश शाह आपल्या घरी जेवण करत होते, त्याच वेळी हे दुर्दैवी अपघात झाला. अनेक वृत्तांमध्ये चुकीची माहिती दिली जात असल्यामुळे ही गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक होते, असे त्यांनी नमूद केले.
अशोक पंडित यांच्या पोस्टमुळे जी माहिती सुरुवातीला व्हायरल झाली होती, ती आता राजेश कुमार यांच्या अधिकृत वक्तव्यानंतर चुकीची ठरली आहे. सतीश शाह यांच्या निधनामुळे चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.












Click it and Unblock the Notifications