सना खान दुस-यांदा झाली आई, पोस्ट शेयर करत दिली गोड बातमी

Sana Khan gives birth to second child: बॉलिवूड अभिनेत्री सना खानने तिच्या चाहत्यांसाठी गोड बातमी दिली आहे. सना खान दुसऱ्यांदा आई झाली असून यावेळी तिने मुलाला जन्म दिला आहे. सनाचे पती मुफ्ती अनस सईद यांनीही त्यांच्या मुलाच्या कानात अजान वाचली. तसेच त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

सनाने व्लॉगमध्ये तिच्या मुलाच्या जन्माची माहिती दिली आहे. मुलगा ठणठणीत असल्याचेही तिने सांगितलं आहे. सनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, अल्लाह तालाने नशिबात सर्वकाही लिहिले आहे. वेळ आल्यावर अल्लाह देतो. ती आल्यावर आनंदाने झोळी भरतो.

Sana Khan

सना खानने 22 नोव्हेंबर 2022 रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून तिच्या गरोदरपणाची माहिती दिली होती. त्यात त्यांनी सांगितले होते की, आता तीनचे चार होणार आहेत. दोघांनी 2020 मध्ये लग्न केले. या जोडप्याने 2023 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केलं आहे.

सनाच्या पहिल्या मुलाचे नाव तारिक जमील आहे. सनाने आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या 18 व्या वर्षी केली होती. तिने जवळपास 50 चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण 2020 मध्ये मुफ्ती अनस सईदसोबत लग्न केल्यानंतर तिने ग्लॅमरच्या दुनियेला अलविदा केलं. यानंतर ती फक्त तिच्या व्लॉगमध्येच माहिती शेअर करत असते. याशिवाय सनाच्या काही विधानामुळे चर्चेत राहते.

काही दिवसांपूर्वी सना खान रुबिना दिलीकच्या पॉडकास्ट 'किसी ने बता नहीं'वर दिसली होती. सना खान दिलीकच्या या मुलाखतीत तिने तिचा चित्रपट प्रवास आणि अध्यात्म अंगीकारण्याबद्दल मोकळेपणाने बोलली आहे. ती पुढे म्हणाली की, जेव्हा मी अशा पुरुषांना पाहतो तेव्हा मला विचित्र वाटते की, ते आपल्या बायकोला असे कंजूष कपडे घालून कसे बाहेर काढतात, याचा त्यांना अभिमानही वाटतो. सना म्हणाली की, पुरुषांना त्यांच्या जोडीदाराच्या कपड्यांबाबत स्वाभिमानाची भावना असली पाहिजे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+