"बाॅम्बने उडवू, घरात घुसून मारू" सलमान खानला धमकी, डोकेदुखी संपेना! व्हाॅट्सअॅपवर आला इशारा
Salman Khan threatened to kill him again : बॉलिवूड सुपरस्टार आणि चाहत्यांचा लाडका भाईजान सलमान खानच्या मागचे शुक्लकाष्ट संपता संपेना. त्याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवर अज्ञात व्यक्तीने धमकीचा संदेश पाठवल्याची घटना मुंबईच्या वरळी परिसरातून समोर आली आहे.
सलमान खानसाठी पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये त्याच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली आहे तसेच त्याची कार बॉम्बने उडवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ही बाब गांभीर्याने घेत वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमानला धमकीचा कुठे आला संदेश?
प्राप्त माहितीनुसार, आता सलमान खानला धमकीची पोस्ट पाठवणाऱ्याचा पोलिसांनी तपास सुरू केला असून सायबर टीमही संशयिताचा शोध घेत आहे. मुंबई पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा संदेश वरळी वाहतूक विभागाच्या अधिकृत क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्यात आला आहे. या मेसेजमध्ये सलमान खानला त्याच्या घरी जीवे मारण्याची आणि त्याच्या कारला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सलमानला धमकीचा संदेश पाठवणाऱ्यावर वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या धमकीप्रकरणात आत्तापर्यंत सलमान खान किंवा त्याच्या कुटुंबियांकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही पण त्याची आणि चाहत्याची चिंता मात्र, वाढली आहे.
याआधी भाईजान होता बिष्णोई गँगच्या रडारवर
भाईजान हा चिंकारा काळवीट हत्याप्रकरणापासून लाँरेन्स बिष्णोई गँगच्या रडारवल आलेला आहे. मागील वर्ष सलमानच्या आयुष्यात धमकीने भरलेले होते. त्याच्या घरावर पोलिसांचा चोख बंदोबस्तही लावण्यात आला होता. धमकीच्या पार्श्वभुमीवर सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. लाँरेन्स बिष्णोईच्या नावाने भाईजानला अनेक धमक्या आलेल्या आहेत.
घरावर झाला होता गोळीबार
घरावर गोळीबार, अनेकवेळा मिळालेल्या धमक्या सलमान खानसाठी ही पहिलीच गोष्ट नाही. याआधीही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांसारख्या गुन्हेगारांकडून अभिनेत्याला अनेकदा धमक्या आल्या आहेत. याशिवाय सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराचीही घटना घडली आहे. असे असूनही, सलमान खानने त्याच्या व्यावसायिक बांधिलकीशी कधीही तडजोड केली नाही. दरम्यान आजच्या ताज्या धमकीनंतर मुंबई पोलिस सलमान खानच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले असून प्रकरणाचे गांभीर्य पाहता प्रत्येक कोनातून तपास केला जात आहे.
हेही वाचा : सलमान 59 तर रश्मिका मंदान्ना 28 वर्षांची! जाणून घ्या तिचे वडिल कोण, कुटुंब, शिक्षण, प्रियकाराबद्दल












Click it and Unblock the Notifications