Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लॉरेन्स टोळीच्या धमक्या तरीही सलमानने केली तगड्या बंदोबस्तात 'Bigg Boss 18'ची शुटींग!

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीच्या टारगेटरव सलमान खान आहे. सातत्याने अभिनेत्याला जीव घेण्या धमक्या मिळू लागल्या आहेत. त्यामुळे सलमान खान होस्ट करत असलेल्या बीग बॉसची शुटींग बंद होणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. तर त्याच्याऐवजी दुसरे कोणीतरी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणार असे बोलले जात होते. परंतु, कडक सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा एकदा सलमान खानने बीग बॉसचे शुटींग सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

सलमान खान यास सातत्याने मिळत असलेल्या धमक्यानंतर पोलिस सुरक्षा देखील तैनात करण्यात आलेली आहे. तर 'बिग बॉस 18'मधून ब्रेक घेतल्याची बातमीही आली होती. यावेळी 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानच्या जागी फराह खान दिसणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, यावर सलमान खानकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या सर्व बातम्यांना पूर्णविराम देत सलमान खानने पुन्हा एकदा शुटींग करिता पुनरागमन केले आहे. सलमान खान बिग बॉसच्या सेटवर परतल्याची बातमी समोर आली आहे. तर सेटवर सुमारे 60 हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात असल्याचे सांगितले जात आहे.

Salman Khan  Bigg Boss Hindi

'बिग बॉस 18' पेजनेही केले ट्विट

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान पुन्हा बीग बॉस 18 च्या सेटवर आला आहे. यासंदर्भात 'बिग बॉस 18' च्या बिग बॉस या फॅन पेजनेही सलमान खानबद्दल ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सांगितले होते की, वीकेंड का वारचे शूट लवकरच सुरू होणार आहे. 'वीकेंड का वार'च्या संदर्भात बिग बॉसने एका ट्विटमध्ये लिहिले की, 'वीकेंड का वार'चे शूटिंग सुरू होणार आहे आणि सलमान खानही सेटवर पोहोचला आहे. वीकेंड का वार कडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? अविनाशला त्याच्या कृत्याबद्दल फटकारले जाईल का? की घरातील बाकीच्यांना फटकारले जाईल. का अविनाशला सलमान खानची साथ मिळेल?, असा प्रश्न देखील करण्यात आलेला आहे.

सिकंदरच्या टीम तैनात

तगड्या सुरक्षेसह सलमान खान 'वीकेंड वार'चं शूट करत असल्याचं म्हटलं जात आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, सलमान गेल्या रात्री तगड्या सुरेक्षसह सेटवर गेला होता. सेटवर कंपाउंड बनवलं गेलं असून तिथेच त्याला राहायचं आहे. सिंकदरच्या टीमने प्रोडक्शन आणि चॅनेलबरोबर बातचित केली आहे. जेणेकरून सर्व काही सुरळीत सुरू राहिलं.

60 हून अधिक सुरक्षा जणांची सुरक्षा

एवढंच नव्हे तर सलमान खानबरोबर वैयक्तिक सुरक्षेसह वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे भाईजानच्या आजूबाजूला 60 हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच सलमान खानसाठी बनवण्यात आलेल्या कपाउंडमध्ये बाहेरच्यांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

बाबांची हत्या, सलमान रुग्णालयात

बाबा सिद्दिकींच्या हत्येची बातमी 'बिग बॉस 18' च्या पहिल्या वीकेंड एपिसोड दरम्यान आली होती. यावेळी सलमान खान शूट सोडून हॉस्पिटलमध्ये धावला. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर सलमान खानसह संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे मित्र होते. त्यांच्या निधनानंतर सलमान खानची प्रकृती बिघडली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+