'सिकंदर'मध्ये रश्मिकासोबतच्या रोमान्सबद्दल नेटक-यांकडून सलमानला ट्रोल , भाईजानचं ट्रोलर्संना सडेतोड
'सिकंदर' हा चित्रपट बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटसृष्टीत खूप लोकप्रिय होत आहे. पुढील आठवड्यात ईदच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना आहेत. चित्रपटात अॅक्शन आणि रोमान्स दोन्ही पाहायला मिळत आहे.
चित्रपटात मुख्य कलाकार सलमान आणि रश्मिका मंदान्ना हे दोघेही त्यांच्या वयाच्या अंतरामुळे चर्चेत आहेत. आता सलमानने त्याच्या टीकाकारांना प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, जर रश्मिकाला यात काही अडचण नाही, तर इतरांना यात अडचण का आहे. सलमान खानने त्याच्या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. तो म्हणाला की मी अशा गोष्टींचा जास्त लोड घेत नाही.

मुंबईतील ट्रेलर लाँच कार्यक्रमात रश्मिकासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. त्या दरम्यान संभाषणाच्यावेळी सलमानने सोशल मीडिया ट्रोलर्सबद्दल भाष्य केलं आहे. जेव्हा होस्टने सलमानचे कौतुक केले तेव्हा भाईजान म्हणाला, "कधीकधी काहीतरी गडबड होते की मी 6-7 रात्री झोपत नाही, मग ते सोशल मीडियावरचे लोक माझे मागे लागतात, ते लोक म्हणतात की, अभिनेत्री आणि माझ्यामध्ये 31 वर्षांचा फरक आहे, जेव्हा अभिनेत्रीला काही अडचण नाही, तिच्या वडिलांना काही अडचण नाही, तेव्हा तुम्हाला का अडचण आहे ? जेव्हा त्यांचे लग्न होईल, त्यांना मूलं होतील, तेव्हा ही मी त्यांच्यासोबतही काम करेन. आम्हाला आईची परवानगी मिळेल." या कमेंटवर रश्मिका हसताना दिसली.
सलमान खानने आपल्या कमेंट्सद्वारे ट्रोलर्सना योग्य उत्तर दिले आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांनाही आनंद झाला. सिकंदरच्या या ट्रेलरला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
स्टारकास्ट आणि निर्मिती
सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त या चित्रपटात काजल अग्रवाल, सत्यराज, शर्मन जोशी आणि एसजे सूर्या यांच्याही भूमिका आहेत. साजिद नाडियाडवाला यांनी त्याची निर्मिती केली आहे. सलमान आणि साजिद 10 वर्षांनी एकत्र काम करत आहेत. याआधी दोघांनी 'किक' चित्रपटात एकत्र काम केले होते. प्रीतमने सिकंदर चित्रपटाला संगीत दिले आहे. संतोष नारायणन यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. चित्रपटातील तीन गाणी - 'जोहरा जबीं', 'बम बम भोले' आणि 'सिकंदर नाचे' आतापर्यंत प्रदर्शित झाली आहेत.जी सोशल लोकांच्या पसंदीस उतरले आहेत.












Click it and Unblock the Notifications