सलमान खानला पाकिस्तानने 'दहशतवादी' घोषित केले! 'भाईजान'च्या 'त्या' कृतीमुळे पाकिस्तानात भूकंप..
Salman Khan Declared Terrorist by Pakistan : आपल्या 'दबंग' अंदाजाने आणि 'भाईजान' या नावाने कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता सलमान खान, आता एका आंतरराष्ट्रीय राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे, या वादातूनच सलमान खानचे नाव पाकिस्तानने त्यांच्या फोर्थ शेड्युल्डमध्ये टाकले आहे. याचा अर्थ पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी असे म्हटले आहे.

सौदी अरेबियातील एका कार्यक्रमादरम्यान नकळतपणे केलेल्या एका वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तान सरकारने, सलमान खानला चक्क 'दहशतवादी' घोषित केले आहे. या धक्कादायक निर्णयामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, एका कलाकाराचे शब्द भू-राजकीय वादळ कसे निर्माण करू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण बनले आहे.
नेमके प्रकरण काय? सौदीत काय म्हणाला सलमान?
हा संपूर्ण वाद सौदी अरेबियात आयोजित 'जॉय फोरम २०२५' या कार्यक्रमातील सलमान खानच्या भाषणाने सुरू झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सलमान सौदीमध्ये कष्ट करणाऱ्या विविध देशांतील लोकांचे कौतुक करत होता. यावेळी तो म्हणाला, "हे बलुचिस्तानचे लोक आहेत, अफगाणिस्तानचे लोक आहेत, पाकिस्तानचे लोक आहेत, प्रत्येकजण सौदी अरेबियात मेहनतीने काम करत आहे." या वक्तव्यात त्याने 'बलुचिस्तान' चा उल्लेख 'पाकिस्तान' पासून वेगळा केला. हीच गोष्ट पाकिस्तान सरकारच्या जिव्हारी लागली.
पाकिस्तान सरकारची संतप्त प्रतिक्रीया
पाकिस्तान सरकारने सलमानच्या या वक्तव्याला आपल्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला मानले आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने एक अधिकृत अधिसूचना जारी करून, सलमान खानला दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत 'फोर्थ शेड्यूल' मध्ये टाकले आहे.
पाकचे 'फोर्थ शेड्यूल' म्हणजे काय?
ही एक अशी यादी आहे ज्यात दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी किंवा त्यांचे समर्थन करणाऱ्या संशयित व्यक्तींची नावे टाकली जातात. या यादीत नाव आल्यास त्या व्यक्तीवर पाकिस्तानात प्रवास बंदी, मालमत्ता जप्त करणे आणि कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
सलमान खानची प्रतिक्रीया काय?
सलमान खानने जे वक्तव्य केले त्यावर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे, त्यामुळेच त्यांनी फोर्थ शेड्युल्डमध्ये सलमानचे नाव टाकले आहे. या गंभीर प्रकरणावर अद्याप सलमान खान किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
बलुच नेत्यांकडून सलमानचे स्वागत, वाद आणखी वाढला
एकीकडे पाकिस्तान सरकार संतप्त असताना, दुसरीकडे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांनी मात्र सलमान खानचे आभार मानले आहेत. बलुचिस्तानला स्वतंत्र देश बनवण्याची मागणी करणारे नेते मीर यार बलूच म्हणाले, "सलमान खानने बलुचिस्तानचा केलेला उल्लेख सहा कोटी बलूच नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांनी असे करून सांस्कृतिक मान्यतेचे संकेत दिले आहेत.












Click it and Unblock the Notifications