Salman Khan The Bull : सलमान खानचा 250 कोटींचा चित्रपट थांबला, नेमकं काय झालं? जाणून घ्या!
Why Salman Khan's The Bull Movie Was Cancelled : 2023 च्या सुरुवातीला एक बातमी समोर आली होती. ज्यामध्ये करण जोहर सैन्यावर आधारित एक चित्रपट बनवणार आहे, ज्याचे नाव 'द बुल' असे असणार आहे. करण या चित्रपटात सलमान खानला मुख्य अभिनेता म्हणून कास्ट करणार होता आणि या बातमीने चाहते खूप उत्सुक होते.
पण त्यानंतर डिसेंबर 2023 मध्येच आणखी एक बातमी आली, ज्यामध्ये असे सांगण्यात आले की हा चित्रपट थांबवण्यात आला आहे. सलमान खानसोबतचा हा चित्रपट करण जोहरने का थांबवला? यामागील कारण काय आहे हे सर्वांना जाणून घ्यायचे होते. पण आता जवळजवळ दोन वर्षांनंतर, 'द बुल' का बंद करण्यात आला याचे खरे कारण समोर आले आहे.

'द बुल' बंद होण्यामागील नेमकं कारण काय?
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, जेव्हा करण जोहरने सलमान खानला 'द बुल' चित्रपटाची कथा सांगितली तेव्हा त्याला ती आवडली. या चित्रपटात सलमान खान एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार होता, ज्यामध्ये भारत-मालदीव संघर्षाची खरी कहाणी देखील दाखवली जाणार होती.
करण जोहरने चित्रपटाची कथा विष्णुवर्धन यांना लिहिण्यासाठी दिली होती आणि ते त्याचे दिग्दर्शनही करणार होते. चित्रपटाच्या कथेनुसार, सलमान व्यतिरिक्त आणखी एका अभिनेत्याची निवड होणार होती पण तो अंतिम होऊ शकला नाही.
करण जोहर आणि विष्णुवर्धन यांना या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राला कास्ट करायचे होते, पण सलमानला त्याचा बॉडीगार्ड शेराचा मुलगा टायगर लाँच करायचा होता. सलमानने विष्णू आणि करणला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण काही जमले नाही. चित्रपटाचे बजेट 250 कोटींपेक्षा जास्त होते आणि चित्रपटातील कलाकारांमध्ये कोणताही समन्वय नव्हता, म्हणून करणने चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
सलमान खानचा सद्या कोणता चित्रपट रिलीज झाला?
सलमान खानचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट सिकंदर होता जो 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला. सिकंदर चित्रपटाने पहिल्या दिवशी 26 कोटी रुपये कमावले आणि पहिल्या आठवड्यात 90.25 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने 11 दिवसांत एकूण 107.01 कोटी रुपये कमावले आहेत आणि अजूनही त्याची कमाई वाढण्याची शक्यता आहे.
'सिकंदर' हा चित्रपट ए.आर. मुरुगदास यांनी दिग्दर्शित केला आहे. ज्यांनी 'गजनी' हा चित्रपट देखील बनवला होता. 'सिकंदर' चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत होता, त्याच्याशिवाय रश्मिका मंदान्ना, काजल अग्रवाल, शर्मन जोशी आणि सत्यराज सारखे कलाकार या चित्रपटात दिसले होते.












Click it and Unblock the Notifications