'सैफची अवस्था पाहून मी घाबरली होते, हल्ला झाल्यानंतर पत्नी करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया
Saif Ali Khan News : बॉलिवूड अभिनेता आणि भोपाळचा नवाब सैफ अली खान गेल्या तीन दिवसांपासून चर्चेत आहे. 15 जानेवारी 2025 च्या मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने सपासपा 6 वार करुन त्याला गंभीर जखमी केलं. त्यानंतर लागलीच त्याला ऑटो रिक्षाने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
बुधवारी सकाळी त्याच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी या प्रकरणाचा मुंबई पोलिस बारकाईने तपास करत आहेत.

'सैफची अवस्था पाहून मी घाबरली होते'
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूर हिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. हल्ल्याच्या वेळी करीना घाबरली होती, असं करीना कपूर खानने पोलिसांना सांगितले आहे. करीना म्हणाली की, सैफ अली खानने हस्तक्षेप केल्यामुळे हल्लेखोर मुलगा जेहपर्यंत पोहोचू शकला नाही.
करीना कपूर खानने तिच्या निवेदनात म्हटले आहे की- हल्लेखोराने घरातून काहीही चोरले नाही. परंतु त्याचे वर्तन खूप आक्रमक होते. या काळात आरोपीने सैफवर आक्रमक हल्ला केला होता, ज्यामुळे मी घाबरले होते. मी माझा धाकटा मुलगा जेह याला हल्लेखोरापासून वाचवण्यासाठी घराच्या 12 व्या मजल्यावर पाठवलं.
आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांचे 35 पथके रवाना
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रकरणाचा सध्या मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेच्या 25 पथके बारकाईने तपास करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अनेक सीसीटीव्ही फुटेज देखील स्कॅन करण्यात आले आहेत. एका व्हिडिओमध्ये हल्लेखोर वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ फिरताना दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो मोबाईल दुकानात हेडफोन खरेदी करताना दिसत आहे.
सैफवर हल्लाप्रकरणी 40 ते 50 जणांची चौकशी
सैफ अली खानवर हल्ला होऊन 48 तास उलटले तरी पोलिसांना अद्याप आरोपीचा सुगावा लागला नाही. या प्रकरणी पोलिसांनी 40 ते 50 लोकांची चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूर खान इतकी घाबरली होती की तिची बहीण करिश्मा कपूरने तिला तिच्यासोबत खार येथील घरी घेऊन गेली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 40 ते 50 जणांची चौकशी केली आहे. घटनेच्या दिवशी अभिनेत्याच्या घरी काम करणाऱ्या घरकाम करणाऱ्या नोकराचीही पोलिसांनी चौकशी केली आहे.
दरम्यान घरकाम करणाऱ्या महिलेने पोलिसांना सांगितले होते की, हल्लेखोर अचानक घरात घुसला आणि बोट दाखवून आवाज करू नको असं सांगितले. पण ती महिला ओरडली त्यानंतर सैफ अली खान बेडरुमच्या बाहोर पोहोचला आणि त्यानंतर हल्लेखोराने तिच्यावर चाकूने आक्रमक हल्ला केला.












Click it and Unblock the Notifications