सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे पहिला फोटो जाहीर! पायऱ्यावरुन धावताना दिसला!

Saif Ali Khan attack case : बाॅलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. फायर एक्झिट पायऱ्यांवर तो धावताना दिसला आहे. म्हणजेच हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने फायर एक्झिटच्या जिन्यातून घरात घुसले आहे.

Saif Ali Khan attack case

संशयिताचा पहिला फोटो जारी

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या द वांद्रे येथील घरात घुसून हल्ला करणाऱ्या संशयिताचे पहिले छायाचित्र जारी झाले आहे. मुंबई पोलिसांनी गुरुवारी, 16 जानेवारी रोजी माहिती दिली की, हल्ला करणारा संशयित फायर एक्झिट पायऱ्यांवरून धावताना दिसला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी कैद झाला आहे.

सैफ अली खानची प्रकृती धोक्याबाहेर

सैफ अली खानवर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. सध्या ते लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. त्याच्या शरीरावर सहा जखमा असून पाठीचा कणा आणि मानेवर गंभीर जखमा आहेत. लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी सांगितले की, सैफ अली खानला त्याच्या वांद्रे येथील घरात अज्ञात व्यक्तीने भोसकले आणि त्याला पहाटे 3.30 वाजता रुग्णालयात आणण्यात आले.

सैफवर सहावेळा वार

डाॅ. उत्तमाैनी यांनी सांगितले की, सैफवर सहा वेळा वार करण्यात आले होते, त्यापैकी दोन खोल होते. यापैकी एक मणक्याजवळ आहे. सैफ अली खानवर लीलावती हॉस्पिटलचे देशातील आघाडीचे न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे उपचार करत आहेत. न्यूरो सर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन आणि भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांची टीम सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करत आहे. या पथकाचे नेतृत्व डॉ.नितीन डांगे करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+