Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आज रश्मिका-विजय देवरकोंडाचे लग्न! उदयपूरमध्ये शाही सोहळा; मेन्यूपासून पाहुण्यांपर्यंत डिटेल्स वाचा

Rashmika mandanna vijay deverakonda wedding today : "पडद्यावरची 'क्रेझी' केमिस्ट्री आता खऱ्या आयुष्यात 'मॅरेज' गोल सेट करण्यासाठी सज्ज झाली आहे! ज्या क्षणाची लाखो चाहते गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते, तो सुवर्णक्षण अखेर आज आला आहे. साऊथचे सर्वात हॉट कपल विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना आज उदयपूरच्या राजेशाही थाटात एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालणार आहेत. 'VIROSH' च्या या शाही लग्नाची पहिली झलक कशी असेल? वाचा या 'बिग फॅट इंडियन वेडिंग'चे इनसाईड डिटेल्स..."

Rashmika mandanna vijay deverakonda wedding today

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची आज २६ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्नगाठ सर्वांच्या साक्षीने बांधली जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळणार असून, राजस्थानच्या उदयपूरमधील एका आलिशान पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळ्याचे हे अपडेट्स जाणून घेऊया.

'द वेडिंग ऑफ VIROSH' (The Wedding Of VIROSH)

चाहत्यांनी रश्मिका आणि विजय या जोडीला प्रेमाने 'VIROSH' हे नाव दिले आहे. आपल्या चाहत्यांचा सन्मान करत या जोडीने अधिकृतपणे आपल्या लग्नालाही याच नावाने संबोधित केले आहे. २२ फेब्रुवारीला इंस्टाग्रामवर या नावाची घोषणा करून त्यांनी चाहत्यांना एक मोठे सरप्राइज दिले होते.

लग्न सोहळ्यातील खास आकर्षणे

वेन्यू आणि प्रायव्हसी: उदयपूरमध्ये अत्यंत खासगी पद्धतीने (Private Wedding) हा सोहळा होत आहे. लग्नात 'नो फोन पॉलिसी' लागू करण्यात आली आहे, जेणेकरून लग्नाचे फोटो किंवा व्हिडिओ लीक होणार नाहीत.

पारंपारिक विधी: २४ फेब्रुवारीला भव्य संगीत सोहळा पार पडला. विजयची आई माधवी देवरकोंडा यांनी रश्मिकाला पारंपारिक बांगड्या भेट देऊन तिचे कुटुंबात स्वागत केले आहे.

मेन्यूमध्ये भारतीय आणि जपानी तडका: लग्नाच्या जेवणात दाक्षिणात्य पदार्थांसोबतच (इडली-डोसा) पंजाबी, बंगाली आणि मुघलाई पदार्थांची मेजवानी असणार आहे. याशिवाय पाहुण्यांसाठी खास जपानी डिनरची देखील सोय करण्यात आली आहे.

पाहुण्यांची मांदियाळी

या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित आहेत. दिग्दर्शक तरुण भास्कर, अभिनेत्री ईशा रेब्बा आणि स्टायलिस्ट श्रव्या वर्मा हे उदयपूरमध्ये आधीच पोहोचले आहेत. तसेच, अभिनेत्री तमन्ना भाटियानेही या जोडीला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

हैदराबादमध्ये होणार ग्रँड रिसेप्शन

उदयपूरमध्ये लग्नाचे विधी आटोपल्यानंतर, ४ मार्च २०२६ रोजी हैदराबादमध्ये एका भव्य स्वागत समारंभाचे (Reception) आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये साऊथ आणि बॉलीवूडमधील अनेक मोठे सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+