Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बाजार नको..! रश्मिका-विजय देवरकोंडाने नाकारली नेटफ्लिक्सची 60 कोटींची ऑफर; 'हे' आहे त्यामागचे कारण

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Reject ₹60 Crore Deal :"दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना आणि 'रौडी स्टार' विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या सोशल मीडिया गाजतोय. पण या लग्नाआधीच त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाने सर्वांनाच थक्क केलं आहे. एका प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मने दिलेली ६० कोटी रुपयांची तगडी ऑफर या जोडीने धुडकावून लावली असून, त्यामागचं कारण वाचून तुम्हीही त्यांचं कौतुक कराल."

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda

लग्नाचे व्यावसायिकरण नको!

मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्ससारख्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मने या जोडीच्या लग्नाचे चित्रीकरण आणि हक्क मिळवण्यासाठी ६० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र, विजय आणि रश्मिकाने याला स्पष्ट नकार दिला. आपल्या आयुष्यातील हा अत्यंत खाजगी आणि पवित्र क्षण त्यांना व्यवसायाचे साधन बनवायचा नाही, अशी त्यांची भूमिका असल्याचे सूत्रांनी सांगितले. जर त्यांना लग्नाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर करायचे असतील, तर ते त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून मोफत शेअर करतील, असेही समजते.

लग्नाचे ठिकाण आणि तारीख

गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. ताज्या माहितीनुसार, हे जोडपे २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथील एका हेरिटेज पॅलेसमध्ये विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल.

'गीता गोविंदम' पासून सुरू झालेली प्रेमकथा

'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉमरेड' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर या दोघांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली होती. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. आता ६० कोटींची ऑफर नाकारल्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांचे चाहते 'खरा साधेपणा' म्हणत त्यांना दाद देत आहेत.

हेही वाचा : 2026मध्ये होणार सर्वात मोठा धमाका! बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंड्स्ट्रीत होणार हातमिळवणी, सलमान खान..

हेही वाचा : न्यूयॉर्कचा 'इंडिया डे परेड': विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना यांची 'को-ग्रँड मार्शल्स' म्हणून निवड!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+