Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कित्येक युट्यूब चॅनेल, अल्पावधीत करोडपती रणवीर इलाहाबादियाचा विषय सोप्पा नाही

Ranveer Allahbadia Net Worth: प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर इलाहाबादिया त्याच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे. रणवीर इलाहाबादिया समय रैनाच्या इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये सामील झाला. त्यावेळी त्यानं एका स्पर्धकाला एक प्रश्न विचारला. या प्रश्नामुळं सोशल मीडियावर रणवीरवर बरीच टीका होत आहे. रणवीर इलाहाबादियाला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

रणवीर इलाहाबादियाने बॉलिवूड, हॉलिवूड स्टार, ज्योतिषी इत्यादी विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. रणवीर नेहमीच त्याच्या पॉडकास्ट, स्टायलिश लूक आणि फिटनेसमुळे चर्चेत असतो. चला जाणून घेऊया कोण आहे रणवीर इलाहाबादिया, त्याची जीवनशैली, करिअर आणि एकूण संपत्ती.

Ranveer Allahbadia

रणवीर इलाहाबादियाचा जन्म 2 जून 1993 रोजी मुंबईत झाला. त्याने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले. 2015 मध्ये द्वारकादास जीवनलाल संघवी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.टेक पूर्ण केले.

रणवीर हा बियरबायसेप्स या नावानेही प्रसिद्ध आहे. वयाच्या 22 व्या वर्षी कारकिर्दीला सुरुवात करून त्याने YouTuber आणि पॉडकास्टर म्हणून स्वतःचे नाव कमावले. तो मोंक एंटरटेनमेंटचा सह-संस्थापक देखील आहे. इलाहाबादिया सात यूट्यूब चॅनेल चालवतो. या चॅनलचे 1.2 कोटींहून अधिक सबस्क्राइबर आहेत.

रिपोर्ट्सनुसार रणवीर इलाहाबादिया यूट्यूब आणि पॉडकास्टमधून दरमहा सुमारे 35 लाख रुपये कमावतो. त्याच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत ज्यात YouTube जाहिराती, रॉयल्टी, ब्रँड प्रायोजकत्व यांचा समावेश आहे. याशिवाय रणवीर ब्रँड प्रमोशन आणि जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार 2024 पर्यंत रणवीर इलाहाबादियाची एकूण संपत्ती अंदाजे 60 कोटी रुपये आहे. त्याच्याकडे फक्त एकच कार आहे, स्कोडा कोडियाक, ज्याची किंमत सुमारे 34 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

रणवीर इलाहाबादियाच्या या विधानावर आता अनेक मोठ्या व्यक्तींच्या प्रतिक्रियाही येत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर इलाहाबादियाच्या समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये निर्माण केलेल्या वादावर भाष्य केले. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण जेव्हा ते इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करते तेव्हा ते संपते, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

इंडियाज गॉट लेटेंटच्या अलीकडील भागात जसप्रीत सिंग, आशिष चंचलानी आणि अपूर्वा मखीजा सारखे कंटेंट क्रिएटर्स पाहुणे परीक्षक म्हणून होते. शो दरम्यान रणवीर इलाहाबादियाने एका स्पर्धकाच्या पालकांबद्दल काही अश्लील कमेंट केल्या होत्या, ज्यामुळे तो आता वादात सापडला आहे. या वादावर भाष्य करणाऱ्यांपैकी फ्लाइंग बीस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला युट्यूबर गौरव तनेजा याने एक्स वर आपले मत व्यक्त केले. भारतामधून युट्यूब बंद केल्याशिवाय समय रैना शांत बसणार नाही, असं तनेजाने म्हटलं आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+