Ranveer Allahbadia रणवीर अलाहाबादिया प्रकरणात मोठी अपडेट, युट्यूबरच्या घरी पोलिस दाखल
Ranveer Allahbadia: रणवीर अलाहबादिया प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. 5 पोलिस अधिकाऱ्यांचे पथक आज दुपारी मुंबईतील वर्सोवा येथील युट्यूबर आणि पॉडकास्टरच्या घरी पोहोचलं आहे. रणवीर अल्लाहबादियाने पालकांवरील अश्लील टिप्पणीवरून आता वाद खूप वाढला आहे.
दरम्यान अश्लील टिप्पणीवरुन रणवीर इलाहाबादिया सध्या अडचणीत वाढ झाली आहे. आसाम पोलिसांनी रणवीर अलाहबादिया आणि समय रैना यांच्यासह 5 जणांवर मोठी कारवाई केल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वर्सोवा पोलिस स्टेशनमधील दोन पोलिस अधिकारी युट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहेत. रणवीर अलाहबादियाविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीबद्दल विचारले असता, एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले - आम्हाला याबद्दल कोणतीही माहिती नाही. बीट मास्टर्स असल्याने आम्हाला येथे फेऱ्यांसाठी यावे लागते. आम्ही फक्त सुरक्षेच्या कारणास्तव इथे आलो आहोत, असं म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनंतर युट्यूबने कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमधील वादग्रस्त भाग काढून टाकला आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादियाने अश्लील टिप्पणी केली होती.या प्रकरणी लोकांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आणि त्याच्यावर अश्लीलतेचा आरोप करत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
#WATCH | Maharashtra: Two police officials from Versova Police Station leave from the residence of YouTuber Ranveer Allahabadia.
— ANI (@ANI) February 11, 2025
On being asked about a complaint filed against Ranveer Allahabadia, a police official says "We do not have any information regarding this. As a beat… pic.twitter.com/uYwYz0rLJP
आसाम पोलिसांनी केला गुन्हा दाखल
आसाम राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की, रणवीर अलाहाबादियासह आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग, अपूर्व मखीजा, समय रैना आणि इतरांविरुद्धही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. स्टँड-अप कॉमेडियन समय रैना याच्या इंडियाज गॉट लेटेंट शोच्या अलीकडील भागात अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल आसाम पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी दिली आहे.
रणवीर अलाहाबादियाची अश्लील टिप्पणी
मीडिया रिपोर्ट्सनुसार मुंबई पोलिसांनी रणवीर अल्लाहबादिया आणि समय रैना याला चालू असलेल्या वादाच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे - भारत सरकारच्या आदेशानंतर रणवीर अलाहबादिया यांच्या अश्लील आणि विकृत टिप्पण्या असलेले यूट्यूबचे 'इंडिया हॅज लेटेंट' एपिसोड ब्लॉक करण्यात आले आहेत.












Click it and Unblock the Notifications