रणवीर इलाहाबादियाला अश्लील कमेंट केल्याबद्दल मोठी किंमत मोजावी लागली, आता प्रेयसीने केलं ब्रेकअप ?

Ranveer Allahbadia Breakup: युट्यूबर रणवीर इलाहाबादिया सध्या वादग्रस्त विधानामूळे चर्चेत आहे. अलीकडेच त्याने समय रैनाच्या इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये पालकांबद्दल एक वाईट टिप्पणी केली. त्यानंतर त्याला चांगलेच ट्रोल केले जात आहे. आता बातम्या येत आहेत की रणवीरच्या प्रेयसीचे त्याच्याशी ब्रेकअप झालं आहे.

रणवीर इलाहाबादिया त्याचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवतो. पण त्याने पालकांच्या बाबतीत केलेल्या चुकीच्या कमेंटनंतर त्याची प्रेयसी निक्की शर्माने त्याच्याशी ब्रेकअप केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. इन्स्टंट बॉलिवूडच्या रिपोर्टनुसार दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत आहेत.

Ranveer Allahbadia Breakup

काही दिवसांपूर्वी रणवीर इलाहाबादियाने त्याच्या वेकेशनचे काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये तो एका मुलीसोबत दिसला होता. फोटो पाहून चाहत्यांना अंदाज आला की, रणवीर त्याची प्रेयसी निक्कीसोबत सुट्टीवर गेला आहे. त्याने फोटोंमध्ये आपला चेहरा लपवला होता. दोघांचाही एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पण आता रणवीरच्या पालकांबद्दलच्या कमेंटनंतर निक्कीने त्या युट्यूबरशी ब्रेकअप केल्याच्या बातम्या येत आहेत. निक्कीने तिच्या इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिने लिहिले, 'योग्य लोक तुम्हाला ऐकले, प्रेम केले, पात्र आणि मूल्यवान वाटू देतात.' दरम्यान या अफवा किती खऱ्या आहेत याबद्दल रणवीर आणि निक्कीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आशिष चंचलानी, रणवीर इलाहाबादिया आणि अपूर्व मखीजा हे समय रैनाच्या शो इंडियाज गॉट लेटेंटमध्ये पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. यादरम्यान रणवीरने एका स्पर्धकाला इतका वाईट प्रश्न विचारला की तो ऐकून चाहतेही हैराण झाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे, लोक कायदेशीर कारवाईची मागणी करत आहेत. मात्र, रणवीरने एक व्हिडिओ शेअर करून याबद्दल माफीही मागितली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+