Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ड्रामा क्वीनचे धार्मिक 'नाटक'! राखी सावंतने स्वीकारला इस्लाम; पण धर्मांतराचा हा आहे जुना इतिहास!

Rakhi Sawant Converts to Islam : बॉलिवूडमधील 'आयटम डान्सर' आणि रिअॅलिटी शो स्टार राखी सावंत ही तिच्या बेधडक विधानांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यातील वादामुळे नेहमीच चर्चेत असते.

काही दिवसांपूर्वीच तिने इस्लाम धर्म स्वीकारल्याच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळब उडाली आहे. राखी सावंतचे धर्मांतर हे एखाद्या चित्रपटाच्या कथानकापेक्षा कमी नाही, कारण तिने यापूर्वीही अनेक वेळा धर्मांतराबद्दल चर्चा केली आहे.

Rakhi Sawant Converts to Islam

इस्लाम धर्म स्वीकारला अन् ५ वेळा नमाज!

राखी सावंतने अलीकडेच जाहीर केले की ती आता मुस्लिम आहे आणि इस्लामचे नियम काटेकोरपणे पाळते. इतकेच नाही तर तिने दिवसातून पाच वेळा नमाज करत असल्याचेही सांगितले.

आदिल दुर्रानीसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधानंतर तिने मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे सांगितले होते. तथापि, राखी सावंत धर्मामुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिच्या धार्मिक इतिहासाची कथा अनेक रंजक वळणे घेते.

हिंदू कुटुंबात जन्म, नंतर ख्रिश्चन धर्म स्वीकार

बिग बॉसच्या घरात असताना राखीने तिच्या धार्मिक प्रवासाबद्दल काही खुलासे केले होते

हिंदू धर्मात जन्म

राखी सावंतचा जन्म एका हिंदू कुटुंबात झाला होता आणि ती नेहमीच हिंदू प्रथा-परंपरा पाळायची. गणपती पूजा हा तिचा आवडता सण आहे आणि ती दरवर्षी गणपतीची स्थापना करते, याचे असंख्य फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत.

ख्रिश्चन धर्माकडे कल

बिग बॉसच्या घरात तिने सांगितले की, तिच्या कुटुंबाने नंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. तिच्या आईचा अंत्यसंस्कार देखील ख्रिश्चन विधींनुसार करण्यात आला होता. तिच्या आईच्या आजारपणात ती अनेकदा चर्चमध्ये प्रार्थना करताना दिसली आणि या काळात तिने वारंवार बायबल आणि ख्रिश्चन पद्धतींचा उल्लेख केला होता.

आईच्या निधनानंतर, काही काळ ख्रिश्चन धर्म पाळत असल्याचे सांगणाऱ्या राखीने अचानक पुन्हा सांगितले की, ती हिंदू धर्माचे पालन करते आणि भगवान गणेश तसेच इतर हिंदू देवतांवर तिचा पूर्ण विश्वास आहे.

पब्लिसिटी स्टंट की वैयक्तिक निवड?

आदिल दुर्रानीसोबतच्या संबंधानंतर तिने मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे जाहीर केले. त्यांच्या ब्रेकअपनंतर, इस्लाम धर्माबद्दल विचारले असता, तिने असेही म्हटले होते की, ती एकाच वेळी गणपती आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवते.

आता पुन्हा एकदा राखी सावंतने स्वतःला मुस्लिम घोषित करून नवीन वाद निर्माण केला आहे. तिने तिच्या नवीन 'नामकरण' आणि नवीन व्हिडिओंद्वारे सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

नेटकऱ्यांचे मत: बरेच लोक राखीच्या या वारंवारच्या धर्मांतराला एक पब्लिसिटी स्टंट किंवा चर्चेत राहण्याचा मार्ग मानत आहेत. तर काहीजण याला तिची वैयक्तिक निवड म्हणून पाहत आहेत.

राखी सावंतचा हा वारंवार बदलणारा धार्मिक प्रवास पाहता, 'ड्रामा क्वीन' म्हणून तिची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+