गायक दिलजीत दोसांझने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, एकत्र गायलं गाणं, व्हिडिओ व्हायरल
Diljit Dosanjh Meet PM Narendra Modi : प्रसिध्द पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या चर्चेत आहे. 2024 मध्ये त्यांच्या 'दिल-लुमिनाटी टूर'ने प्रेक्षकांची मने जिंकली. भारतातील अनेक शहरांमध्ये आयोजित केलेल्या त्यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये लाखो लोकांनी हजेरी लावली .
दिलजीत दोसांझने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
हा संगीत दौरा संपल्यानंतर दिलजीत दोसांझने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. दिलजीतने 2025 वर्षाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी खास भेट घेऊन केली. या भेटीचे फोटो दिलजीतने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

फोटो सौजन्य- पीटीआय
दिलजीत दोसांझने व्हिडिओ केला शेअर
गायक दिलजीत दोसांझने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या संभाषणाचा एक रीलही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओ रीलच्या सुरुवातीला दिलजीत हातात मोठा पुष्पगुच्छ घेऊन पीएमओ कार्यालयात प्रवेश करताना दिसत आहे. यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुष्पगुच्छ दिले आहेत.
व्हिडिओमध्ये दिलजीत दोसांझ पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मोकळेपणाने बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचवेळी पीएम मोदींनी दिलजीतचेही कौतुक केले आणि म्हणाले की, "भारतातील एका खेड्यातील मुलगा जेव्हा जगात आपले नाव प्रसिद्ध करतो तेव्हा खूप छान वाटते".
A fantastic start to 2025
— DILJIT DOSANJH (@diljitdosanjh) January 1, 2025
A very memorable meeting with PM @narendramodi Ji.
We talked about a lot of things including music of course! pic.twitter.com/TKThDWnE0P
' कुठेही गेला तरी तो लोकांची मने जिंकत आहे'
गायक दिलजीत दोसांझला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की "तू तुझ्या नावाशी खरा आहेस आणि तू जिथे जाशील तिथे लोकांची मने जिंकत आहेस". दिलजीत पीएम मोदींसोबत योगावर चर्चा करतानाही दिसत आहे. आपल्या जीवनशैलीत योगाचा अवलंब केल्यानंतर त्याचे जीवन कसे बदलले हे दिलजीत कबूल करतो.
'माझा भारत महान आहे' याचा खरा अर्थ मला समजला'
दिलजीत दोसांझ पुढे म्हणला की, "जेव्हा मी भारतभर फिरलो तेव्हा मला 'माझा भारत महान' चा खरा अर्थ समजला. नंतर, दिलजीत शीख गुरू, गुरू नानक देव जी यांना श्रद्धांजली वाहणारे एक गाणे गातो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळच्या टेबलला आपल्या तळहाताने मारून ताल देताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या शेवटी दिलजीत दोसांझने पंतप्रधान मोदींना सलाम केला आणि त्यांना त्यांच्या दिल लुमिनाटी टूर टूरचे पोस्टर भेट म्हणून दिले. पंतप्रधान मोदी त्याला आशीर्वाद देताना दिसत आहेत.
'पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबतची अविस्मरणीय भेट'
दिलजीत दोसांझ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ही छायाचित्रे दिजित दोसांझ यांनी शेअर केली आहेत आणि कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 2025 ची चांगली सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासोबतची अतिशय अविस्मरणीय भेट. आम्ही संगीतासह अनेक गोष्टींबद्दल बोललो.












Click it and Unblock the Notifications