Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

RSSच्या व्यासपीठावर 'भाईजान'ची एन्ट्री; प्रसाद ओकची प्रतिक्रिया, म्हणाला- सलमानचं येणं म्हणजे...

Prasad Oak reacts to Salman Khan over RSS Programme : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'नवे क्षितीज' या व्याख्यानमालेने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कार्यक्रमात केवळ राजकीयच नव्हे, तर चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली.

मात्र, या सर्वांमध्ये सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या उपस्थितीची. सलमानच्या या अनपेक्षित एन्ट्रीवर आता मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने आपली महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Prasad Oak reacts to Salman Khan

सेलिब्रिटींची मांदियाळी आणि सलमानची एन्ट्री

मुंबईतील नेहरू सेंटर येथे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत या भव्य सोहळ्याचे उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याला हेमा मालिनी, अक्षय कुमार आणि जॅकी श्रॉफ यांसारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. परंतु, जेव्हा सलमान खानने सभागृहात प्रवेश केला, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सलमानचे संघाच्या कार्यक्रमात दिसणे हे अनेकांसाठी आश्चर्यकारक होते.

"हे दृश्य खूपच इंटरेस्टिंग..." - प्रसाद ओक

व्याख्यानमालेच्या सांगता समारंभाला महेश मांजरेकर, सुनील बर्वे आणि प्रसाद ओक या मराठी कलाकारांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसाद ओक म्हणाला की, सलमान खानची उपस्थिती माझ्यासाठी खरोखरच शॉकिंग होती. पण हे दृश्य खूपच इंटरेस्टिंग वाटलं. सलमान खानचं संघाच्या कार्यक्रमात येणं, हे एकप्रकारे त्याने संघाच्या कार्याप्रति दाखवलेला सन्मान आहे, असं मला वाटतं. त्याने या कार्यक्रमात हजेरी लावली, हे पाहून मला खूप आनंद झाला. प्रसादच्या मते, एका मोठ्या सेलिब्रिटीने अशा वैचारिक व्यासपीठावर येणे हे सकारात्मक बदलाचे लक्षण आहे.

सुनील बर्वे यांची परखड भूमिका

यावेळी ज्येष्ठ अभिनेते सुनील बर्वे यांनीही सलमानच्या उपस्थितीचे स्वागत केले. ते म्हणाले की, "संघाचे विचार ऐकण्यासाठी सलमान खान आला ही अतिशय चांगली गोष्ट आहे. सलमान एक चांगला माणूस आहे आणि त्याला आदर्श लोकांसमोर ठेवण्याची आवड आहे. कदाचित संघाविषयी त्याच्या मनात काही शंका किंवा 'किंतु-परंतु' असतील, ज्यांची उत्तरे शोधण्यासाठी तो येथे आला असावा. त्याचे हे पाऊल स्वागतार्ह आहे."

'नवे क्षितीज' व्याख्यानमालेचा समारोप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या वर्षाच्या पदार्पणानिमित्त आयोजित ही व्याख्यानमाला वैचारिक देवाणघेवाणीसाठी महत्त्वाची ठरली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित प्रेक्षकांशी आणि कलाकारांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. बॉलिवूडपासून ते मराठी चित्रपटसृष्टीपर्यंतच्या कलाकारांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम वैचारिक मंथनासोबतच ग्लॅमरच्या वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+