अभिनेत्री पूनम पांडेला जबरदस्तीने किस घेण्याचा प्रयत्न, चाहते संतापले, व्हिडिओ पाहून बसेल धक्का!
एका पॅप सेशन दरम्यान अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडेला धक्का चांगलाच धक्का बसला आहे. अभिनेत्री पापाराझींशी बोलत असताना मागून एक चाहता तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. तिने होकार दिल्याच्या क्षणी, चाहता तिला जबरदस्तीने किस घेण्यासाठी झुकला. ज्यामुळे पूनम पांडेसह उपस्थित पापाराझींना देखील धक्काच बसला. वेळीच पापाराझींनी विरोध केल्यानंतर ती त्याच्या तावडीतून सुटली.
अभिनेत्रींना चाहते कायमच गराडा घालता
आपण अनेकदा पाहिलं असेल की सेलिब्रिटींसोबत अनेक विचित्र प्रकार घडतात. विशेषत: अभिनेत्रींसोबत असे किस्से अनेकदा घडताना समोर आलं आहे. एखादी सेलिब्रिटी एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असता त्यांच्या भोवती चाहत्यांचा प्रचंड गराडा असतो. कधी कधी गर्दीचा फायदा घेत अनेक जण अभिनेत्रींनी हात लावणे किंवा त्यांच्याजवळ येत जबरदस्तीने सेल्फी काढणे वैगरे असे अनेक प्रकार करतात.

पूनम पांडेसोबत नेमकं काय घडलं?
असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे प्रसिद्ध मॉडल पूनम पांडे हिच्यासोबत. पूनम पांडे शुक्रवारी बोल्ड ड्रेसमध्ये पापाराझींसमोर फोटोसाठी पोज देत असताना अचानक एक चाहता तिच्या पाठीमागून आला आणि त्याने तिच्याजवळ येत सेल्फीसाठी विनंती केली आहे. मात्र ती काही उत्तर देण्याच्या आतच त्याने असं काहीतरी विचित्र गैरवर्तन केलं की सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर, पूनमने चाहत्याला दूर ढकलताना दिसते. ज्या क्षणी तिला काय घडत आहे हे कळले नाही. पापाराझींनी तिच्या बचावासाठी उडी मारली आणि चाहत्याला त्याच्या हावभावाबद्दल विचारले. असे का वागलाच म्हणून त्याला सवाल केला.
व्हिडिओ व्हायरल!
सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये काही नेटकऱ्यांनी चाहत्याची बाजू घेतली तर काही चाहत्यांनी पूनम पांडेची बाजू घेऊन तिचे समर्थन केले.












Click it and Unblock the Notifications