सैफवर हल्ला करणाऱ्याचं नाव आलं समोर; कोठे राहतो? काय करतो? वाचा महत्त्वाची अपडेट
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयीताचं नाव आता समोर आलं आहे. पोलिसांनी दोन सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडे सध्या चौकशी सुरु केली असून, चौकशीसाठी ताब्यात घेतलेला तरुण कोण, याबबच चर्चा सुरु होत्या. मात्र आता त्या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे.

कोण आहे संशयीत?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव शाहिद आहे. शाहीद याला गिरगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. शाहिदवर याआधी तीन-चार घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. हा सैफ अली खान प्रकणातील आरोपी आहे की नाही? हे पोलिसांनी अजून स्पष्ट केलेलं नाही. पण, आम्ही लवकरच हे प्रकरण उघडकीस आणू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय.
कोठे घेतलं ताब्यात
शाहिदीवर यापूर्वीही तीन-चार घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी संशयीत म्हणून त्याची चौकशी सुर केली आहे. मुंबई पोलीस शाहिदची सध्या कसून चौकशी करत आहेत. मुंबईच्या ताडदेव पोलिसांनी फॉकलँड रोडवरील गिरगावमधून त्याला ताब्यात घेतलं. सध्या तोच सैफ अली खानवर हल्ला करणार संशयीत आहे का, याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. मात्र त्याचं नाव शाहीद आहे, एवढीच माहित सध्या समोर आली आहे.
गुरुवारी पहाटे झाला हल्ला
अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे २.३० च्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्याचं प्राथमिक तपासाअंती सांगण्यात आलं आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोर जबरदस्तीने किंवा कुठलीही मोडतोड न करता घरात घुसल्याचं दिसून आलं आहे. हल्लेखोर घरात शिरला आणि त्याने सैफवर चाकूने सहा वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला तत्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.












Click it and Unblock the Notifications