Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हेराफेरी- 3 चा वाद विकोपाला! परेश रावल यांनी दिलं 'हे' उत्तर! आता बाबुभैय्याची भुमिका कोण करणार?वाचा

Paresh Rawal : हेराफेरीत बाबूभैय्याची उत्तम आणि दर्जेदार भूमिका साकारणारे परेश रावल यांचा हेराफेरीचे सिक्वेल आल्यानंतर आता हेराफेरी 3 ची उलट अर्थाने चर्चा सुरु झाली आहे. या वर्षी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात चर्चेचा विषय हेराफेरी 3 चाच आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सिने रसिकांमध्ये मोठा उत्साह होता, आता पुन्हा बाबूभैय्याच्या रुपात परेश रावल यांचा धमाकेदार अभिनय पाहायची पर्वणी येणार यामुळे सर्वच चाहते आनंदी होते पण परेश रावल यांनी चित्रपट सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर आता हे प्रकरण विकोपाला गेले आहे.

Paresh Rawal

परेश रावल यांनी हेराफेरी 3 हा चित्रपट सोडण्याची घोषणा करताच निर्मात्यांनी हे प्रकरण न्यायालयात नेण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे परेश रावल यांना 25 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. यासंदर्भात वनइंडिया हिंदीने वृत्त दिले त्यानुसार, माहिती अशी आहे की, परेश रावल यांनी 11 लाख रुपयांची साइनिंग रक्कम घेतली आणि या चित्रपटाचे चित्रीकरण केले, त्यानंतर अचानक हेराफेरी - 3 सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागले असे म्हटले जात आहे.

वृत्त असेही आहे की, परेश रावल यांनी चित्रपट साईन केल्यानंतर घेतलेली 11 लाख रुपयांची रक्कम 15 टक्के व्याजासह परत केली आहे. याशिवाय, परेशने हेराफेरी 3 सोडण्यासाठी अक्षयच्या कंपनीला आणखी काही पैसे दिले आहेत. टर्म शीटनुसार, परेश यांनी 11 लाख रुपयांची स्वाक्षरी रक्कम मिळवली. आता परेश रावल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून एक निवेदन जारी केले आहे.

काय आहे परेश रावल यांची एक्स पोस्ट?

परेश रावल यांनी X वर लिहिले, "माझे वकील अमित नाईक यांनी माझ्या कायदेशीर निलंबनाबद्दल आणि बाहेर पडण्याबद्दल योग्य उत्तर पाठवले आहे. त्यांनी माझे उत्तर वाचल्यानंतर सर्व मुद्दे निकाली निघतील." परेश रावल यांच्या या ट्विटवरून हे देखील स्पष्ट होते की त्याने संपूर्ण पैसे परत केले आहेत. याशिवाय, ते हेराफेरी 3 च्या निर्मात्यांना कायदेशीर पद्धतीने उत्तर देत आहे.

सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रीया

परेश रावल यांच्या पोस्टखाली एका व्यक्तीने लिहिले, नो बाबू राव नो हेरा फेरी. आता मला चित्रपट पहायचाही नाही, ज्या अभिनेत्यामुळे चित्रपट इतका मोठा झाला त्याच्यावर 25 कोटी रुपयांचा खटला दाखल करण्यात आला आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत साहेब, अशा काही परेश रावल यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रीया आल्या आहेत.

या आधीच्या पोस्टमध्ये काय म्हणाले परेश रावल?

परेश रावल म्हणाले , "मी हे नोंदवू इच्छितो की हेरा फेरी ३ पासून दूर जाण्याचा माझा निर्णय सर्जनशील मतभेदांमुळे नव्हता. मी पुन्हा सांगतो की चित्रपट निर्मात्याशी कोणतेही सर्जनशील मतभेद नाहीत. चित्रपट दिग्दर्शक श्री प्रियदर्शन यांच्यावर मला अपार प्रेम, आदर आणि विश्वास आहे."

टिझर शुट आता पुढे काय?

हेराफेरी 3 चा निर्मात्यांनी टीझर शूट केला होता. तो सोशल मीडियावरही आला आहे. "पैसा तो पैसा है भाई, इसे पाने के लिए दिमाग की दिवार भी तोडनी पडे...पैसे की तो बात छोडो.." असा संवाद या टीझरमध्ये आहे, त्यात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे दिसतात, 1 मिनिट 50 सेकंदाचा हा टिझर आहे पण आता परेश रावल यांनी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे या निर्णयानंतर निर्माते काय भूमिका घेतात हे येत्या काही काळात पुढे येईल. या चित्रपटातील बाबू भैय्याच्या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा आणि नाना पाटेकर यांसारख्या कलाकारांची नावे सध्या चर्चेत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+