Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

OTT Release This Week: तुमचा आठवडा होणार मनोरंजक; ओटीटीवर 'या' चित्रपटांसह शाहरुखच्या मुलाच पदार्पण

OTT Releases This Week 15 to 21 September : तुमचा हा आठवडा मनोरंजक बनवण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन चित्रपट आणि वेब सीरिज येत आहेत.

'या' आठवड्यात (15 ते 21 सप्टेंबर 2025) कौटुंबिक मनोरंजनापासून थ्रिलरपर्यंत आणि कोर्टरूम ड्रामापासून एका मोठ्या पदार्पणापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

चला तर जाणून घेऊया, या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या प्रमुख चित्रपट आणि वेब सीरिजची कोणत्या आहेत अन् त्यात काय असणार खास स्टोरीच अन् मनोरंजनाचा तडका.

OTT Releases This Week

शाहरुखच्या मुलाचं 'ओटीटी' पदार्पण

या आठवड्यातील सर्वात मोठी बातमी म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची पहिली वेब सीरिज 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

या मालिकेत बॉबी देओल, राघव जुयाल आणि लक्ष्य लालवानी यांच्यासारखे कलाकार आहेत, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ही मालिका आर्यनच्या करिअरसाठी एक मोठी सुरुवात ठरू शकते, अशी आशा आहे.

या आठवड्यातील प्रमुख ओटीटी रिलीज

तुमच्या आवडीनुसार निवडण्यासाठी येथे काही उत्तम पर्याय आहेत:

हाऊस मेट्स (House Mates)

१९ सप्टेंबर रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणारी ही एक कौटुंबिक कॉमेडी मालिका आहे. नवविवाहित जोडपे आणि त्यांच्या विचित्र शेजाऱ्यांची कथा तुम्हाला हसवेल आणि हलकेफुलके मनोरंजन देईल.

द सर्फर (The Surfer)

आयुष्यापासून निराश झालेला एक माणूस आपल्या गावी परततो आणि सर्फिंगच्या एका गटाशी त्याचा सामना होतो, ही या चित्रपटाची भावनिक कथा आहे. हा चित्रपट तुम्हाला एका वेगळ्याच प्रवासावर घेऊन जाईल.

हॉन्टेड हॉटेल (Haunted Hotel)

मुलांना आणि मोठ्यांनाही आवडेल असा हा अॅनिमेटेड शो १९ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर येत आहे. एका जुन्या हॉटेलमध्ये लपलेल्या भुतांच्या रहस्यांची ही कथा तुम्हाला खिळवून ठेवेल.

सैयारा (Saiyara)

थिएटरमध्ये यश मिळाल्यानंतर आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. ज्यांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहता आला नाही, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

वरदात (Varadat)

१८ सप्टेंबर रोजी चौपाल या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही मालिका प्रदर्शित होत आहे. ही मालिका महत्त्वाकांक्षा, फसवणूक आणि सामाजिक संघर्षाची एक जटिल कथा सादर करते.

या आठवड्यात विविध प्रकारचे सिनेमे आणि वेब सिरीज येत असल्याने प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा पुरेपूर डोस उपलब्ध आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+