Oscars 2025 : भारतातील Live Streaming तारीख, वेळ; कधी आणि कुठे पहायचा हा सोहळा, वाचा...
लॉस एंजेलिसमधील प्रतिष्ठित डॉल्बी थिएटरमध्ये उद्या (ता. ३) पहाटे 97 वा अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्काराचे वितरण होणार आहेत. हॉलीवूडचा सर्वात महत्त्वाचा व लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्काराची जगभरातील चित्रपट रसिक वाट पाहत आहेत. आपल्या आवडत्या तारे-तारकांना बक्षिस मिळताना पाहण्याची ही एक चांगली संधी असते. या भव्य सोहळ्याबद्दलचे सर्व महत्त्वाचे तपशील आम्ही येथे सांगणार आहेत.

कुठे पहायचे थेट प्रक्षेपण?
युनायटेड स्टेट्समध्ये ABC वर रात्री 8:00 PM ET / 5:00 PM PT पासून याचे प्रक्षेपण केले जाईल. भारतातील प्रेक्षक ते सोमवारी 3 मार्च रोजी पहाटे 5:30 पासून ट्यून इन करू शकतात. डिस्ने + हॉटस्टार द्वारे त्याचे प्रक्षेपण होईल. याशिवाय हा सोहळा स्टार मूव्हीज आणि स्टार मूव्हीज सिलेक्टवर थेट पाहण्यासाठी उपलब्ध असेल.
यजमान आणि सूत्रसंचालक?
या वर्षीच्या समारंभाचे आयोजन एमी पुरस्कार विजेते कॉमेडियन आणि टेलिव्हिजन प्रेझेंटर कॉनन ओ'ब्रायन करणार आहेत. त्यांनी ऑस्करचे प्रमुख पाहुणे म्हणून पदार्पण केले आहे. इव्हेंटमध्ये ओप्रा विन्फ्रे, एम्मा स्टोन, स्कारलेट जोहान्सन, रॉबर्ट डाउनी ज्युनियर आणि झो साल्दाना आदी प्रभावी निवेदकही असणार आहेत.
कुणाचे आहेत विशेष परफॉर्मन्स
या सोहळ्यात एरियाना ग्रांडे आणि सिंथिया एरिव्हो हे त्यांच्या संगीत नाटक 'विक्ड' मधील गाणी सादर करतील. याव्यतिरिक्त, या कार्यक्रमात ब्लॅकपिंकच्या लिसा, रे, डोजा कॅट आणि क्वीन लतीफाह यांचे परफॉर्मन्स सादर केले जाणार आहेत.
कुणाला आहेत नामांकने?
2025 ऑस्करने त्यांच्या नामांकनांमध्ये विविध प्रकारचे प्रतिभावंत कलाकार व त्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन केले आहे. कार्ला सोफिया गॅस्कोनने 'एमिलिया पेरेझ' मधील तिच्या भूमिकेसाठी अभिनय नामांकन मिळवणारी पहिली खुलेआम ट्रान्सजेंडर महिला म्हणून इतिहास रचला आहे. जी 13 नामांकनांसह आघाडीवर आहे. यानंतर 'द ब्रुटालिस्ट' आणि 'विक्ड' या दोघांनी प्रत्येकी 10 नामांकने मिळवली आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीमध्ये, टिमोथी चालमेट आणि ॲड्रिन ब्रॉडी हे प्रबळ दावेदार आहेत. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीमध्ये सिंथिया एरिव्हो, कार्ला सोफिया गॅस्कोन, डेमी मूर, फर्नांडा टोरेस आणि मिकी मॅडिसन यांच्यात स्पर्धा आहे. दरम्यान, भारतामध्ये सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीत नामांकन मिळवून इतिहास रचणाऱ्या गुनीत मोंगा आणि प्रियांका चोप्रा यांच्या पाठीशी असलेल्या 'अनुजा' या चित्रपटावर सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications