Oscar 2025: नमस्ते इंडिया ऑस्करसोबत नाश्ता करा', होस्टने स्टेजवर भारताबद्दल हिंदीत केले 'हे' विधान
oscar 2025 Inida : जगातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा रंगतदार अवस्थेत असून हॉलीवूड करांसाठी आजची रात्र सर्वात मोठी रात्र आहे म्हणजेच ऑस्कर पुरस्कार 2025 सोहळा जोरदार मोडवर आहे. 97 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये पूर्वीपेक्षा मोठ्या कलाकारांनी थक्क केले आहे. हा कार्यक्रम ग्लॅमर आणि धक्कादायक क्षणांनी भरलेला असताना, शोचा होस्ट कॉनन ओब्रायनने भारतासाठी एक खास गोष्ट आज भर सोहळ्यात सांगितली.
हिंदी भाषेत बोलण्याचा ओब्रायनला पहिला मान
ऑस्कर अवॉर्ड्स 2025 इव्हेंटच्या मंचावर कॉनन ओब्रायनने पहिला हिंदी भाषेत बोलण्याचा ऑस्कर होस्ट म्हणून मान मिळवला आहे. त्याच्या एकपात्री प्रयोगाच्या मध्यभागी, होस्ट कॉनन ओ'ब्रायनने अचानक आपली भाषाच बदलली..आणि तो चक्क हिंदीत बोलू लागला..त्याने काही ओळी बोलल्या, ज्यामुळे सर्वांनाच सुखद धक्का बसला.

काय म्हणाले काॅनन ओब्रायन?
सध्या अमेरिकेत 2 मार्चची रात्र असून भारतात 3 मार्चची सकाळ आहे. भारतात सकाळ झाल्याचा धागा पकडून ओब्रायनने भारताबद्दल एक गोष्ट म्हटली आणि तीही हिंदी भाषेतून 'भारतीय लोक नाश्त्यासोबत ऑस्कर पाहत आहेत' असे कॉनन ओ'ब्रायन म्हणाले - हॅलो... सकाळ झाली आहे, भारतीय नाश्ता करून ऑस्कर बघत आहेत. त्यांची स्क्रिप्ट आणि उच्चारही अधिक चांगले होते आणि त्याला खूप प्रतिसाद मिळाला.
किती लोक आहेत कार्यक्रमात?
ऑस्कर सोहळ्याला सुमारे 10 हजार 500 लोकांनी हजेरी लावली - लॉस एंजेलिसमधील प्रसिद्ध डॉल्बी थिएटरमध्ये 97 वा अकादमी पुरस्कार सोहळा सुरू झाला आहे. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये जगभरातील सुमारे 10,500 लोक सामील झाले आहेत.
अभिनेते आणि दिग्दर्शकांपासून ते संपादक, पोशाख डिझाइनर आणि केस आणि मेकअप कलाकारांपर्यंत, हा प्रतिष्ठित गट चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक पैलूचे प्रतिनिधित्व करतो. हाॅलीवूड सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या रात्रीचा आगळावेगळा अनुभव घेण्यासाठी प्रत्येकजण महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
हेही वाचा : Oscars 2025:ऑस्कर ट्राॅफी बनवायला लागतो एवढा अवाढव्य खर्च; विकायला काढल्यास मिळतात चिल्लर पैसे! वाचा
97 व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन करताना, कॉनन ओ'ब्रायनने वर्षातील काही सर्वात मोठ्या चित्रपट आणि नामांकित व्यक्तींबद्दल मजेदार माहिती देत त्याने प्रेक्षकांना हसवले आणि काही स्टार्सचाही उत्साह वाढवला. तसेच हॉलिवूडच्या सर्वोत्तम चित्रपटांची खिल्ली उडवली.
हेही वाचा : Oscar 2025 : ऑस्कर सोहळ्यात रेड कार्पेटवर हैली बेरीला 'या' कलाकाराने केला किस! बघा व्हिडिओ
हेही वाचा : Oscars 2025: रेड कार्पेटवर फ्री पॅलेस्टाईनची मागणी, द ब्रुटालिस्ट फेम गाय पियर्सने व्यक्त केला निषेध












Click it and Unblock the Notifications