Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Oscar 2025 : ऑस्कर सोहळ्यात रेड कार्पेटवर हैली बेरीला 'या' कलाकाराने केला किस! बघा व्हिडिओ

Oscar 2025 Brutalist actor Adrien Brody kisses Halle Berry : 97 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आज 3 मार्च 2025 रोजी (भारतीय प्रमाणवेळ-तारखेनुसार) रेड कार्पेटवर 'फ्री पॅलेस्टाईन'ची मागणी झाली. त्यानंतर आणखी एक घडामोड समोर आली असून अड्रीयन ब्राॅडी आणि हैली बेरी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जवळपास 22 वर्षांनंतर हा सीन रिक्रिएट झाला असून या व्हिडिओची चर्चाच चर्चा सुरु आहे.

ऑस्कर सोहळ्यात अनेक स्टारकास्ट आणि तारखा आपले खास पोषाख परिधान करुन रेडकार्पेटवर पोहचले आहेत. या सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपण ऑस्कर सोहळ्यात नेमके काय घडले हे जाणून घेऊया.

Oscar 2025

22 वर्षांनंतर पुन्हा किसचा सीन

हैली बेरी आणि एड्रीयन ब्राॅडी यांचा किस आता पुन्हा चर्चेत आला आहे. भर कार्यक्रमात दोघांनी एकमेकांना अलिंगन देत किस केला. हे पाहून उपस्थित अनेकजण भारावून गेले आहेत. याआधी 22 वर्षांपुर्वी त्यांनी असाच किस केला होता आता या कार्यक्रमात त्यांनी हा सीन पुन्हा रिक्रेएट केला आहे.

चाहते काय म्हणत आहेत..?

हैली बेरी आणि एड्रीयन ब्राॅडी यांचा किसिंग व्हिडिओवर आता अनेक कमेंट्स येत आहेत. एका युजरने लिहीले की, हा प्रसिद्धीझोतात आलेला किस, दुसर्‍या युजर्सने लिहिले की, 22 वर्षांनंतर हा सीन पुन्हा रिक्रेएट झाला.

एड्रीयन ब्राॅडी यांना यंदाही नामांकन

एड्रीयन ब्राॅडी यांना यंदाही नामांकन मिळाले आहे, त्यांना प्रसिद्ध चित्रपट द ब्रुटलिस्टसाठी उत्कृष्ट गटात नामांकन मिळाले आहे. तर त्यांचे चाहते म्हणतात की, त्यांनाच ऑस्कर मिळणार आहे, आम्ही तुम्हाला सांगतो की, या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत द ब्रुटलिस्ट सिनेमाला खूप सारे नामांकन मिळालेले आहेत, पण या सिनेमाच्या आणि एड्रीयन ब्राॅडीच्या पदरात ऑस्कर पुरस्कार पडतो की हे पाहायचे आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+