संतापजनक! वैष्णोदेवीला जाऊन पिली दारू; बाॅलीवूड सेलिब्रिटीची सावली असलेल्या ओरीचे कृत्य! गुन्हा नोंद
Orry drinks alcohol at Vaishnodevi pilgrimage site : बॉलिवूड सेलिब्रिटी आणि सोशल मीडियात चर्चेत असणारा सतत बाॅलीवूडच्या अभिनेता, अभिनेत्रींसोबत फोटोत दिसणारा ओरी उर्फ ओरहान अवतारमणी यांने धार्मिक भावनांचा अनादर करणारे कृत्य केले आहे. ज्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
माता वाष्णो देवी येथे ओरी अर्थात अवतारमणी पोहोचला. त्यानंतर कटरा पोलिसांनी ओरी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्यावर एका खासगी हॉटेलमध्ये दारूची पार्टी केल्याचा आरोप आहे, महत्वाची बाब म्हणजे कटरामध्ये दारू आणि मांसाहारावर पूर्ण बंदी आहे. तरीही त्याच्याकडून हे कृत्य घडले.

ओरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
15 मार्च रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ओरी आपल्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्टी करताना दिसला होता. व्हिडिओमध्ये दारूच्या बाटल्याही दिसत होत्या, त्यानंतर हा विषय गतीने पसरत गेला. धार्मिक स्थळांवरील अशा कृत्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत आता कटरा पोलिसांनी तीर्थक्षेत्रात मद्यप्राशन केल्याप्रकरणी ओररीसह 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मुळात वैष्णोदेवी हे धार्मिक आणि पवित्र स्थान आहे. त्या परिसरासह कटरामध्ये कायद्यानुसार दारू विकणे, बाळगणे आणि पिणे याला सक्त मनाई आहे. तरीही असे कृत्य करतानाचा ओरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Jammu & Kashmir | As per police, FIR was registered against eight people, including socialite influencer Orhan Awatramani aka Orry, for allegedly consuming alcohol in a hotel located in Katra
— ANI (@ANI) March 17, 2025
कटरा पोलिसांची कडक कारवाई
एसएसपी रियासी परमवीर सिंह यांनी प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेत आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीर्थक्षेत्रांवर कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ खपवून घेतले जाणार नाहीत, असेही ते म्हणाले. या पार्टीत ओरी व्यतिरिक्त जम्मूचा एक प्रसिद्ध रेस्टॉरंट मालक आणि एक महिला तहसीलदार यांचाही समावेश होता, त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओरी कोण आहे, का आहे प्रसिद्ध?
प्राप्त माहितीनुसार, ओरी हा नेहमी प्रकाशझोतात राहणारा आहे. तो अनेकदा बॉलिवूडच्या मोठ्या सेलिब्रिटींसोबतच्या फोटोंमध्ये दिसतो. त्याचे अनेक तरुण स्टार बॉलीवूड कलाकार आणि अभिनेत्री मित्र म्हणून आहेत, ज्यामुळे तो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.
कटरा हे धार्मिक शहर आहे, तिथे दारू आणि मांसाहारी पदार्थांची विक्री आणि सेवन करण्यास मनाई आहे. प्रशासनाकडून वारंवार इशारे देऊनही अशा घटना उघडकीस येत असल्याने कठोर कारवाई अपेक्षित आहे. आता या प्रकरणी पुढे कोणती पावले उचलली जातात हे पाहायचे आहे.
-
BCCI चा मोठा निर्णय! जसप्रीत बुमराह ठरला टीम इंडियाचा 'सर्वात महागडा' खेळाडू! कमाईत विराट-रोहित मागे -
41व्या वर्षी आई होणार बनू मैं तेरी दुल्हन फेम दिव्यांका त्रिपाठी! उशीरा गर्भधारणेत फॉलो करा या टीप्स -
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क!









Click it and Unblock the Notifications