शाहरुख,सलमान आणि नाही तर हा आहे बॉलीवूडचा सर्वात श्रीमंत व्यक्ती, संपत्ती ऐकूण बसेल धक्का
मुंबई : तुम्हाला जर बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असं कोणी विचारलं तर आपल्या डोळ्यासमोर शाहरुख खान,सलमान खान किंवा आमिर खान या बॉलिवूडच्या तीन खान पैकी एकाचं नाव तुम्ही घ्याल. पण तुमचा इथचं तर तुमचा अंदाज चुकतोय. बॉलिवूडमधील या व्यक्तीचं नाव ऐकूण तुम्हाला काहीसा आश्चर्यचा धक्का बसणार आहे. नुकतीच हुरुन इंडिया रिचेस्ट लिस्ट 2024 यादी प्रसिद्ध झाली आहे.
या रिचेस्ट लिस्टमध्ये बॉलीवूडच्या दिग्गज कलाकरांची नेट वर्थ उघड झाली आहे. इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे. ते यादीत समोर आलं आहे. आज आम्ही तुम्हाला ज्या बॉलीवूड व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगणार आहोत. त्यांच्याकडे बॉलिवूडच्या तीन खानांपेक्षा जास्तीची संपत्ती आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि उद्योगपती रॉनी स्क्रूवाला आहेत. जे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एकमेव अब्जाधीश आहेत. कमाईच्या बाबतीत त्याने इंडस्ट्रीतील तीन खानच नाही तर करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांसारख्या दिग्गज चित्रपट निर्मात्यांनाही मागे टाकले आहे.

हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार शाहरुख खानची एकूण संपत्ती 7300 कोटी रुपये आहे, तर आमिर खानची एकूण संपत्ती 1862 कोटी रुपये आहे. जर आपण सलमान खानच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर ती 2900 कोटी रुपये आहे. या तिघांची मिळून एकूण मालमत्ता 12062 कोटी रुपये आहे. पण ही एकूण संपत्ती रॉनी स्क्रूवाला यांच्या संपत्तीपेक्षाही फारच कमी आहे.
हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार रॉनी स्क्रूवाला यांची एकूण संपत्ती 1.55 अब्ज डॉलर म्हणजेच 13000 कोटी रुपये आहे. जी त्यांना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवते. रॉनी स्क्रूवाला यांनी 1990 मध्ये यूटीव्ही फिल्म्सची स्थापना केली होती. जी त्यांनी डिस्नेला एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किंमत घेऊन विकली होती.












Click it and Unblock the Notifications