Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात मोठा खुलासा, प्रीती झिंटाला कर्जावर 1.55 कोटी रुपयांची सूट

New India Cooperative Bank : मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्या समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं अनेक निर्बंध लादले आहेत. आता या बँकेबद्दल नवीन माहिती समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाला न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेने 18 कोटी रुपयांचे कर्ज फेडण्याच्या बदल्यात 1.55 कोटी रुपयांची सूट दिली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. बँकेने ते नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (एनपीए) म्हणून दाखवले होते. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. प्रीती झिंटाला 2011 मध्ये कर्ज मंजूर झाले आणि अभिनेत्रीने एप्रिल 2014 मध्ये ते परत केले होते.

मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा (EOW) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याची चौकशी करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे, यामध्ये बँकेचे माजी महाव्यवस्थापक आणि लेखा प्रमुख हितेश मेहता यांचा समावेश आहे. मेहताला 15 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. एजन्सीने 2010 पासून बँकेच्या कर्जाच्या डेटाची तपासणी केली आहे.

preity zinta

तपासादरम्यान माहिती समोर आली आहे की, प्रीतीने कर्जासाठी मुंबईत एक फ्लॅट आणि शिमला येथे एक मालमत्ता बँकेत गहाण ठेवली होती. या मालमत्तेची एकूण किंमत 27.41 कोटी रुपये होती. नोव्हेंबर 2012 मध्ये त्यांना बँकेला 11.40 कोटी रुपये परत करावे लागले. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार वेळेवर कर्ज न भरल्यामुळे 31 मार्च 2013 रोजी त्याचे कर्ज खाते अ श्रेणीत वर्गीकृत करण्यात आले. अ श्रेणीतील रक्कम 11.47 कोटी रुपये होती. त्यानंतर बँकेने अंतिम कर्ज सेटलमेंटवर 1.55 कोटी रुपयांची सूट देऊन कर्ज सेटलमेंटची ऑफर दिली. उर्वरित कर्जाची रक्कम अभिनेत्रीने 5 एप्रिल 2014 रोजी भरली आहे.

मुख्य आरोपीचे ब्रेन मॅपिंग केले जाणार

मुंबई पोलिसांची ईओडब्ल्यू शाखा शुक्रवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी हितेश मेहता याची मनी ट्रेल आणि इतर आरोपींच्या सहभागाबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅब (एफएसएल) येथे ब्रेन मॅपिंग चाचणी करणार आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी प्रथम मेहताची पॉलीग्राफ चाचणी केली आणि आता ब्रेन मॅपिंग चाचणी केली जाणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+