10 कोटींची लिगल नोटीस, अन् अभिनेत्री नयनतारा धनुषवर भडकली; वाचा नेमकं प्रकरण काय?
साऊथ फिल्म इंडस्ट्रीची सुपरस्टार अभिनेत्री नयनताराने अभिनेता धनुषवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. वास्तविक, हे संपूर्ण प्रकरण नयनताराच्या जीवनावर आधारित 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल' या माहितीपटाशी संबंधित आहे. धनुषने या माहितीपटातील 3 सेकंदाच्या व्हिज्युअलवर आक्षेप घेत अभिनेत्रीला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यावर आता धनुष अन् नयनतारा यांच्यात वाद पेटला आहे.
नयनतारा काय म्हणाली पत्रात?
नयनताराने आपल्या खुल्या पत्रात लिहिले आहे की, 'तुझे वडील आणि भावामुळे तू एक यशस्वी अभिनेता झालास, पण चित्रपटसृष्टीत माझा कोणी गॉडफादर नव्हता, त्यामुळे मला संघर्ष करावा लागला आणि आज मी माझ्यामुळेच चित्रपटसृष्टीत उभी आहे. माझ्या चाहत्यांना माझे काम माहिती आहे आणि ते माझ्या माहितीपटाची वाट पाहत आहेत, परंतु तुमच्या वृत्तीमुळे आमच्या कामावर मोठा प्रभाव पडला आहे. पण याचे परिणाम तुम्हालाही भोगावे लागतील. तुम्ही दोन वर्षे NOC ची वाट पाहत राहिलात आणि माझी डॉक्युमेंटरी पासही केली नाही, त्यामुळे आम्ही ते पुन्हा एडिट करू, ज्या 3 सेकंदाच्या व्हिज्युअलसाठी तुम्ही 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे, त्याचा निर्णय आता कोर्टात होईल आणि तुमचे कायदेशीर नोटीसला कायदेशीर पद्धतीने उत्तर दिले जाईल.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नयनताराने तिच्या 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल' या माहितीपटासाठी धनुषकडून त्याच्या 'ननुम राउडी धन' चित्रपटातील गाणी आणि दृश्यांसाठी परवानगी मागितली होती. पण धनुषने त्यांना परवानगी देण्यास नकार दिला आणि त्यानंतर डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर पाहिल्यानंतर अवघ्या 3 सेकंदांच्या व्हिज्युअल चोरीच्या आरोपाखाली अभिनेत्रीला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली. नयनतारा स्वतः ननुम राउडी धन या चित्रपटात मुख्य अभिनेत्री होती.
नयनतारा म्हणाली- मी कायदेशीर उत्तर देईल
नयनताराने तीन पानी पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी पुढे लिहिले की, माझ्या चाहत्यांना माझे काम माहीत आहे आणि ते माझ्या या माहितीपटाची वाट पाहत होते. तुमच्या वृत्तीचा मोठा प्रभाव पडला आहे. मात्र, यासाठी तुम्हाला त्रासही सहन करावा लागणार आहे.
तुम्हीच आम्हाला एनओसी देण्यासाठी दोन वर्षे प्रतीक्षा करायला लावले. माझा माहितपटही पास होऊ शकला नाही. म्हणून आम्ही ते पुन्हा संपादित करू. ज्या 3 सेकंदाच्या क्लिपसाठी तुम्ही आम्हाला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली होती, त्यावर न्यायालय निर्णय घेईल.
आम्ही तुमच्या नोटीसला फक्त आता कायदेशीर पद्धतीने प्रतिसाद देऊ. चित्रपट प्रदर्शित होऊन 10 वर्षे झाली आहेत. तुम्ही चित्रपटाबद्दल सांगितलेल्या गोष्टी मी विसरलेलो नाही. मला चित्रपट वर्तुळातून कळले होते की नानुम राउडी धान हा ब्लॉकबस्टर असल्याने तुम्हाला आवडत नाही आणि तुमचा अहंकार खूप दुखावला गेला आहे.












Click it and Unblock the Notifications