Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mukul Dev Death व्यावसायिक पायलट, घोडेस्वारीची आवड; अभिनेते मुकूल देव किती संपत्ती सोडून गेले? वाचा

Mukul Dev Death : सन ऑफ सरदार फेम अभिनेते आणि 'जय हो'मध्ये खलानायकाचे पात्र रंगवणारे दिग्गज कलाकार मुकूल देव यांचे आज 23 मे रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त आज सकाळी आले. मृत्यूसमई ते 54 वर्षांचे होते. त्यांची अचानक एक्झिट बाॅलीवूडसाठी धक्कादायक आहे त्यासह त्यांच्या कुटुंबालाही धक्का बसला आहे.

वृत्तानुसार, मुकुल देव यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. असे सांगितले जात आहे की ते अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, 'सन ऑफ सरदार' चित्रपटात मुकुल देव यांच्यासोबत काम केलेले विंदू दारा सिंग यांनी इंडिया टुडेला अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी दुजोरा दिला. दुःख व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, "मुकुल आता स्वतःला मोठ्या पडद्यावर पाहू शकणार नाही. आईवडिलांच्या निधनानंतर मुकुल देव यांनी स्वतःला वेगळे केले. तो घराबाहेरही पडला नाही आणि कोणालाही भेटला नाही. तो नैराश्यात गेला आणि त्याला त्रास होऊ लागला."

Mukul Dev Death

मुकूल यांनी अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत सिने सृष्टीत पदार्पण केले होते. एक बडे स्टार म्हणू ते नावारुपास आले होते. त्यांच्या निधनाचे बाॅलीवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अनेक टिव्ही आणि सिनेकलाकारांना त्यांच्या निधनाने अतीव दुःख झाले आहे. अनेकांनी त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणाच्या आठवणी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सलमान खान ते अजय देवगणसोबत काम

अभिनेते मुकुल देव यांनी सलमान खानपासून अजय देवगणपर्यंत मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. मुकुल लहानपणापासूनच हुशार होते. ते आठवीमध्ये असताना दूरदर्शनमध्ये काम करत होते. 1996 च्या दस्तक चित्रपटातून त्यांच्या अभिनयाची चुनूक रसिकांना दिसली आणि तेथूनच ते प्रसिद्धीस आले, दुरदर्शनने त्यांना ओळख दिली.

मुकूल देव हे राहूल देव यांचे बंधू

अभिनेते मुकूल देव हे अभिनेता आणि मॉडेल राहुल देव यांचे भाऊ होते. त्यांच्या निधनाने बाॅलीवूड सुन्न असून दिग्गज अभिनेते मनोज कुमारनंतर बाॅलीवूडमध्ये मोठे स्टारकास्टच्या निधनाचे वृत्त येत आहे. मुकूल देव यांनी आजवर त्यांच्या कामातून प्रसिद्धीसह पैसाही कमवला. निधनानंतर ते कोट्यवधीची संपत्ती सोडून गेले आहेत आज त्यांच्या मालमत्तेबद्दल जाणून घेऊया.

किती आहे मुकूल देव यांची संपत्ती?

मुकुल देव हे 29 वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय होते. त्यांनी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये बराच काळ काम केले आहे. अनेक अहवालांनुसार, मुकुल देव यांची एकूण संपत्ती सुमारे 42 कोटी रुपये आहे. मुकूल देव हे अलिशान जीवन जगले. जीवनाकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टीकोनही आगळा वेगळा होता.

व्यावसायिक पायलट, मुंबईत घर

रिपोर्ट्सनुसार, मुकूल देव यांचे मुंबईत घर आहे, या घरात ते एकटेच राहत होते. मुकुल देव यांना घोडेस्वारीचीही आवड होती. ते प्रशिक्षित व्यावसायिक पायलटही होते. त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय विमान वाहतूक अकादमीतून प्रशिक्षण घेतले.
-

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+