'मुफासा' सारखीच आहे किंग खानच्या आयुष्याची कथा, व्हिडिओ शेअर करत सांगितले साम्य
मुफासा: द लायन किंग- हा बहुप्रतिक्षीत चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दाखल झाला आहे. या चित्रपटात शाहरुख खानने मुफासा या व्यक्तिरेखेला आवाज दिला आहे. मुफासाच्या संघर्षाची आणि त्याच्या मेहनतीची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हिच कथा शाहरुखच्या आयुष्याशी साधर्म्य असणारी अशीही चर्चा आहे. अलीकडेच शाहरुखने एका व्हिडीओद्वारे मुफासा या व्यक्तिरेखेसोबतचे त्याचे खोल नाते जगाला सांगितले.

शाहरुखने दिला आहे आवाज
मुफासा : द लायन किंग या चित्रपटात मुफासाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. अनाथ सिंह अशी ओळख असलेला हा सिंह जंगलाचा राजा बनतो. मुफासाचा हा संघर्ष शाहरुख खानने आपल्या आवाजाने जिवंत केला आहे. नुकत्याच आलेल्या एका व्हिडीओमध्ये किंग खानने मुफासाचा प्रवास स्वत:शी जोडताना सांगितले की, ज्याप्रमाणे मुफासाने आपल्या मेहनतीतून आणि संघर्षातून जंगलाचा राजा बनण्याचा अधिकार मिळवला, त्याचप्रमाणे त्यानेही अनेक अडचणींनंतरही भारतीय चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. बनवला आहे.
मुफासा- शाहरुखमध्ये आहे साधर्म्य
मुफासाचा लहान सिंहापासून राजा बनण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. शाहरुखलाही करिअरच्या सुरुवातीला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला होता. अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले होते. सततच्या प्रयत्नांमुळे तो इंडस्ट्रीचा बादशाह बनला आहे. मुफासा या व्यक्तिरेखेत शाहरुखला त्याच्या जीवनातील संघर्ष आणि यशाची झलक पाहायला मिळते. मुफासा द लायन किंग या नवीन व्हिडिओमध्ये शाहरुख खानने स्वत:च्या आणि मुफासामध्ये संबंध शेअर केला आहे.
अनेक भाषांमध्ये होणार प्रदर्शित
या चित्रपटात मुफासाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करुन मुफासा शेवटी जंगलाचा राजा बनतो. हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये ते प्रेक्षकांसाठी उपलब्ध असेल. अनेक भाषांत हा चित्रपट बनविलेला असल्याने तो सर्वभाषिक प्रेक्षकांपर्यंत जावून सुपरडूपर हिट ठरले, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications