राज ठाकरेंची नजर काढून कडाकड मोडली बोटं... त्या प्रसिद्ध गायिकेची एकच चर्चा
मुंबई : पिंगा, घर मोरे परदेसिया सारख्या गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावणारी महाराष्ट्राची महागायिका वैशाली माडे हिच्या एका कृत्याची आज महाराष्ट्रभर चर्चा होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची महागायिका वैशाली माडे यांच्या म्युझिक ॲकाडमीच्या उद्धाटन कार्यक्रमाला हजेरी लावली. राज ठाकरे हे कार्यक्रमाला पोहोचताच वैशाली माडे हिने राज ठाकरे यांची नजर उतरवून त्यांच्या डोक्यावरुन कडाकड बोटे मोडली. हा बोटे मोडण्याचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर प्रचंड फिरला.
वैशाली माडेनी काढली राज ठाकरे यांची नजर
गायिका वैशाली माडेच्या गोरेगाव येथील संगीत ॲकाडमीच्या उद्धाटनाला राज ठाकरे पोहोचले. यावेळी वैशाली माडे यांनी त्यांचं स्वागत केलं. वैशाली माडे यांनी राज ठाकरे यांना टिळा लावून त्यांचं औक्षण केलं. यानंतर वैशाली माडेने त्यांची बोटं मोडून त्यांची नजर काढली. यावेळी वैशाली माडेने म्हटलं की, आज माझी ही म्युझिक ॲकाडमी सुरू होत आहे. याचा आनंद आहे.

राज साहेब ठाकरे हे नेहमी माझ्या पाठीशी उभे आहेत आणि ते आताच नाही तर माझ्या सुरुवातीच्या दिवसापासून आहेत. राजसाहेब मराठी कलाकारांसाठी नेहमी सोबत असतात. त्यांचं इथे येणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला संगीत शिकता आलं पाहिजे, हाच माझा हेतू आहे. जी लोक इथे येऊ शकत नाही, त्यांना मी ऑनलाईन संगीत शिकवणार आहे.
गोरेगावात राज ठाकरेंचं जल्लोषात स्वागत
मनसैनिकांकडून राज ठाकरे यांच्या गोरेगावमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गायिका वैशाली माडे यांच्या ॲकेडमी उद्धाटनासाठी राज ठाकरे येणार असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यात उभे राहून त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी ढोल-तुतारी वाजल्याचं पाहायला मिळालं.












Click it and Unblock the Notifications