मिथून चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार! केंद्रीय मंत्री अश्वीनी वैष्णव यांची घोषणा
Mithun Chakraborty Got Dadasaheb Phalke Award : भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल अॅक्शन मॅन अन् सुप्रसिद्ध कलाकार मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. सिने विश्वातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
आपल्या कसदार अभिनयाने बाॅलीवूडचा स्टार आणि नव्वदीच्या काळात त्यांनी रसिकांवर भुरळ घातली, रसिकांच्या दिलाची धडकन म्हणून त्या काळी मिथून चक्रवर्तींना ओळखलं जातं होतं. त्यांच्या अभिनयाचा सन्मान म्हणुन हा मोठा पुरस्कार त्यांना घोषित झाला आहे.

अश्वीनी वैष्णव यांची पोस्ट
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली असून त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मिथून चक्रवर्तींबद्दल गौरौद्गार केले आहे. खुद्द अश्विनी वैष्णव यांनी पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, "मिथुन दा यांचा गौरवशाली चित्रपट प्रवास पिढ्यांना प्रेरणा देतो! हे जाहीर करताना अभिमान वाटतो की दादासाहेब फाळके निवड ज्युरीने श्री मिथुन चक्रवर्ती जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे"
या दिवशी होणार पुरस्कार वितरण
8 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार मिथून दादांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहितीही अश्विनी यांनी दिली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही महिन्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याची बातमी आली आहे. एप्रिलमध्ये हा समारंभ झाला होता आणि त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सन्मान मिळाला.
काय म्हणाले मिथून चक्रवर्ती?
मिथुन चक्रवर्ती या सन्मानाबद्दल म्हणाले, "मी खूप आनंदी आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाकडे काही मागितले नाही. जेव्हा मला गृहमंत्रालयाकडून मला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचा फोन आला, तेव्हा मी गप्प बसलो होतो. मिनिट कारण मला याची अपेक्षा नव्हती."
डिस्को डान्सर मिथून दा...
मिथुन चक्रवर्ती यांनी 1977 मध्ये त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि ते त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या काही अभिनेत्यांपैकी एक बनले. या अभिनेत्याने आपला प्रवास "मृगया" मधून सुरु केला आणि 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या "डिस्को डान्सर" चित्रपटानंतर ते प्रसिद्ध झाले. यानंतर त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले.












Click it and Unblock the Notifications