Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मिथून दा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार! नावाजलेल्या चित्रपटासह त्यांच्या करिअरविषयी जाणून घ्या

भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल अॅक्शन मॅन अन् सुप्रसिद्ध कलाकार मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. सिने विश्वातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

आपल्या कसदार अभिनयाने बाॅलीवूडचा स्टार आणि नव्वदीच्या काळात त्यांनी रसिकांवर भुरळ घातली, रसिकांच्या दिलाची धडकन म्हणून त्या काळी मिथून चक्रवर्तींना ओळखलं जातं होतं. त्यांच्या अभिनयाचा सन्मान म्हणुन हा मोठा पुरस्कार त्यांना घोषित झाला आहे. सिनेसृष्टीवर सुमारे सहा दशकांपासून अधिराज्य गाजवणारे मिथून दादा यांच्या करिअरविषयी जाणून घेऊया...!

Mithun Chakraborty

अश्वीनी वैष्णव यांची पोस्ट

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली असून त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मिथून चक्रवर्तींबद्दल गौरौद्गार केले आहे. खुद्द अश्विनी वैष्णव यांनी पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, "मिथुन दा यांचा गौरवशाली चित्रपट प्रवास पिढ्यांना प्रेरणा देतो! हे जाहीर करताना अभिमान वाटतो की दादासाहेब फाळके निवड ज्युरीने श्री मिथुन चक्रवर्ती जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे"

या दिवशी होणार पुरस्कार वितरण

8 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार मिथून दादांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहितीही अश्विनी यांनी दिली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही महिन्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याची बातमी आली आहे. एप्रिलमध्ये हा समारंभ झाला होता आणि त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सन्मान मिळाला.

काय म्हणाले मिथून चक्रवर्ती?

मिथुन चक्रवर्ती या सन्मानाबद्दल म्हणाले, "मी खूप आनंदी आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाकडे काही मागितले नाही. जेव्हा मला गृहमंत्रालयाकडून मला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचा फोन आला, तेव्हा मी गप्प बसलो होतो. मिनिट कारण मला याची अपेक्षा नव्हती."

1976 ला पहिला चित्रपट झाला प्रसिद्ध

मिथुन चक्रवर्ती यांनी 1977 मध्ये त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि ते त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या काही अभिनेत्यांपैकी एक बनले. या अभिनेत्याने आपला प्रवास "मृगया" मधून सुरु केला आणि 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या "डिस्को डान्सर" चित्रपटानंतर ते प्रसिद्ध झाले. यानंतर त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

मिथुन चक्रवर्ती यांना 'मिथून दा अशा नावाने देखील ओळखले जाते. (जन्म 16 जून 1952 रोजी झाला. त्यांचे मुळ नाव गौरांग चक्रवर्ती असे आहे. भारतीय अभिनेता, गायक, चित्रपट निर्माता, लेखक आहेत. त्यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर तीन वेळा फिल्मफेर पुरस्कार मिळाला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून ते राज्य सभेवर सदस्य देखील होते. मृगया (1976) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर आज त्यांना दादासाहेब फाळके या पुरस्कार जाहीर झाला असून मिथून दा यांनी आनंदी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पार्श्वभूमी

मिथुन चक्रवर्तीचा जन्म हैदराबाद येथे झाला. चित्रपटात येण्यापूर्वी तो नक्षलवादी होते. मार्शल आर्ट्समध्येही ते ब्लॅक बेल्ट आहे, त्यामुळेच तो चित्रपटांमध्ये ॲक्शन सीन्समध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी देऊ शकले.

शिक्षण

मिथुन दा यांनी प्रसिद्ध स्कॉटिश चर्च कॉलेज, कलकत्ता येथून शिक्षण घेतले आणि तेथून त्यांनी रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

लग्नाविषयी...

मिथुन चक्रवर्ती यांचे लग्न योगिता बालीशी यांच्यासोबत झाले. त्यांना मिमोह, रिमोह, नमाशी, दिशानी अशी चार मुले आहेत. त्या काळात श्रीदेवीसोबतचे त्यांचे अफेअरही वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये बराच काळ गाजले होते.

करिअरविषयी...

मिथुन दा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 'मृगया' या चित्रपटातून केली ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याने मल्टीस्टारर चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली पण 'डिस्को डान्सर' या चित्रपटाने त्याला स्टार बनवले. त्यांनी जवळजवळ प्रत्येक शैलीतील चित्रपटांमध्ये काम केले.

मिथून चक्रवती यांचे आजपर्यंतचे चित्रपट

  • 2007 राख
  • 2007 गुरू
  • 2007 ओम शॉंति ओम
  • 2006 दिल दिया है
  • 2006 कच्ची सड़क
  • 2006 गोलापी एखों बिलाते बंगाली चित्रपट
  • 2006 सुन ज़रा
  • 2006 चिंगारी
  • 2006 अनुरानन बंगाली चित्रपट
  • 2005 लकी कर्नल पिंडी दास कपूर
  • 2005 कालपुरुष
  • 2005 एलान
  • 2005 क्लासिक डांस ऑफ लव
  • 2002 मार्शल
  • 2002 तितली
  • 2001 मेरी अदालत
  • 2001 अर्जुन देवा
  • 2001 बंगाल टाइगर
  • 2001 भैरव
  • 2000 बिल्ला नम्बर ७८६
  • 2000 आज का रावण
  • 2000 जोड़ीदार
  • 2000 सुल्तान
  • 1999 फूल और आग
  • 1999 आग ही आग
  • 1999 आया तूफान
  • 1999 बेनाम
  • 1999 हीरालाल पन्नालाल
  • 1999 सौतेला
  • 1998 यमराज
  • 1998 उस्तादों के उस्ताद
  • 1998 मिलिटरी राज
  • 1998 गुंडा
  • 1998 हत्यारा
  • 1998 हिटलर
  • 1997 क्रांतिकारी
  • 1997 जीवन युद्ध
  • 1997 दादागिरी
  • 1997 गुड़िया
  • 1997 कालिया
  • 1997 लोहा अर्जुन
  • 1997 शपथ
  • 1997 शेर-ए-हिन्दुस्तान इंस्पेक्टर क्रॉंति कुमार
  • 1997 सूरज
  • 1996 भीष्म
  • 1996 निर्भय
  • 1996 रंगबाज़
  • 1996 ज़ंग
  • 1996 अंगारा
  • 1996 अपने दम पर
  • 1996 ज़ुर्माना
  • 1996 मुकद्दर
  • 1995 जल्लाद
  • 1995 निशाना
  • 1995 रावण राज
  • 1995 दिया और तू्फान
  • 1995 द डॉन
  • 1995 गुनहग़ार
  • 1995 अब इंसाफ़ होगा
  • 1995 अहंकार
  • 1994 विवेकानन्द
  • 1994 यार गद्दार
  • 1994 नाराज़
  • 1994 चीता
  • 1994 क्रांति क्षेत्र
  • 1994 परमात्मा
  • 1994 तीसरा कौन
  • 1993 शतरंज
  • 1993 तड़ीपार
  • 1993 फूल और अंगार
  • 1993 दलाल
  • 1993 आदमी
  • 1992 प्यार हुआ चोरी चोरी
  • 1992 दिल आशना है
  • 1992 ज़ख्मी सिपाही
  • 1992 मेरे सजना साथ निभाना
  • 1992 तहदेर कथा
  • 1991 साधु संत
  • 1991 प्रतिज्ञाबद्ध
  • 1991 त्रिनेत्र
  • 1991 झूठी शान
  • 1991 स्वर्ग यहॉं नर्क यहॉं
  • 1991 नम्बरी आदमी
  • 1991 शिकारी
  • 1990 पति पत्नी और तवायफ़
  • 1990 शानदार
  • 1990 अग्निपथ
  • 1990 प्यार का देवता
  • 1990 गुनाहों का देवता

1990 पाप की कमाई
1990 प्यार के नाम कुर्बान
1990 दुश्मन
1990 हमसेना टकराना
1990 लहू का बलिदान
1990 प्यार का कर्ज़
1990 रोटी की कीमत
1989 गलियों का बादशाह
1989 दाता
1989 हम इन्तज़ार करेंगे
1989 भ्र्ष्टाचार
1989 आखिरी गुलाम
1989 लड़ाई
1989 प्रेम प्रतिज्ञा
1989 दोस्त
1989 हिसाब खून का
1989 दाना पानी
1989 गरीबों का दाता
1989 इलाका
1989 मिल गयी मंज़िल मुझे
1989 आखिरी बदला
1989 बॉस
1989 गुरू
1989 मेरी ज़बान
1989 मुज़रिम
1989 रास्ता
1988 बीस साल बाद
1988 गंगा जमुना सरस्वती
1988 अग्नि
1988 रुख़सत
1988 कमांडो
1988 चरणों की सौगन्ध
1988 जीते हैं शान से
1988 मर मिटेंगे
1988 प्यार का मंदिर
1988 साजिश
1988 सागर संगम
1988 वक्त की आवाज़
1987 हवालात
1987 डांस डांस
1987 वतन के रखवाले अरुण प्रकाश
1987 परम धरम
1987 हिरासत
1987 दीवाना तेरे नाम का
1987 मेरा यार मेरा दुश्मन
1987 परिवार
1986 बात बन जाये प्रकाश
1986 कर्मदाता
1986 दिलवाला
1986 ज़िन्दगानी
1986 ऐसा प्यार कहॉं
1986 एक और सिकन्दर
1986 शीशा
1986 प्यार के दो पल
1986 नसीहत
1986 मुद्दत
1986 स्वर्ग से सुन्दर
1986 जाल
1986 अविनाश
1986 मैं बलवान
1985 प्यार झुकता नहीं अजय खन्ना
1985 मॉं कसम
1985 बादल
1985 कर्मयुद्ध
1985 गुलामी
1985 ऑंधी तूफान
1985 बेपनाह
1985 प्यारी बहना
1985 यादों की कसम
1985 आर पार
1985 करिश्मा कुदरत का
1985 मौजां डुबई दियॉं पंजाबी चित्रपट
1984 बॉक्सर
1984 रक्षा बंधन
1984 घर एक मन्दिर
1984 शरारा
1984 कसम पैदा करने वाले की
1984 बाज़ी
1984 जाग उठा इंसान
1984 जागीर
1983 तकदीर
1983 डिस्को डांसर
1983 मुझे इंसाफ चाहिये
1983 वो जो हसीना
1983 फ़रेब
1983 हम से है ज़माना
1983 कराटे
1983 लाल चुनरिया
1983 पसन्द अपनी अपनी
1983 वान्टेड
1982 आमने सामने
1982 स्वामी दादा
1982 सुन सजना
1982 आदत से मजबूर
1982 अशान्ति
1982 तकदीर का बादशाह
1981 हम से बढ़कर कौन
1981 वारदात
1981 साहस
1981 आदत से मजबूर
1981 धुऑं
1981 जीने की आरज़ू
1981 कलंकिनी कंकाबती बंगाली चित्रपट
1981 मैं और मेरा हाथी
1981 समीरा
1981 शौकीन
1980 हम पॉंच
1980 किस्मत
1980 पतिता
1980 उन्नीस बीस
1980 सितारा
1980 आखिरी इंसाफ
1980 कस्तूरी
1980 ख़्वाब
1980 द नक्सेलाइटस
1980 टैक्सी चोर
1979 तराना
1979 अमर दीप
1979 प्रेम विवाह
1979 सुरक्षा
1978 फूल खिले हैं गुलशन गुलशन
1978 हमारा संसार
1978 मेरा रक्षक
1977 मुक्ति
1976 दो अनजाने
1976 मृग्या

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+