Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Miss Universe India 2024: रिया सिंघाने मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज जिंकला

Miss Universe India 2024 : भारतीय सौंदर्यवती रिया सिंघा हिने मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज जिंकला आहे. उर्वशी रौतेलाने विजेतेपदाचा मुकुट रियाच्या डोक्यावर चढवला. या भावनिक प्रसंगी रिया म्हणाली की, 2024 पूर्वी मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब जिंकणाऱ्या लोकांकडून खूप प्रेरणा मिळाली.

Rhea Singha

राजस्थानची राजधानी जयपूर येथे झालेल्या मिस युनिव्हर्स इंडिया 2024 स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर सौंदर्यवती रिया सिंघाने विजेतेपद जिंकल्यानंतर आभार व्यक्त केले आहेत. इथपर्यंत येण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. या स्तरावर पोहोचल्यानंतर मी स्वतःला या मुकुटासाठी पात्र समजते. मागील विजेत्यांकडून मी खूप प्रेरित असल्याचं रियाने सांगितले.

10 वर्षांपूर्वी मुकुट जिंकणारी उर्वशी रौतेला काय म्हणाली?

अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2015 उर्वशी रौतेला म्हणाली, 'सर्व मुलींना काय वाटते ते मला वाटते. विजेते आश्चर्यकारक आहेत. मिस युनिव्हर्सच्या जागतिक व्यासपीठावर ती आपल्या देशाचे उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास उर्वशीने व्यक्त केला. मला पूर्ण आशा आहे की, यावर्षी पुन्हा एकदा भारताला मिस युनिव्हर्सचा ताज मिळेल. सर्व मुली खूप मेहनती, समर्पित आणि खूप सुंदर आहेत, असं उर्वशी रौतेला म्हणाली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+