Mardaani 3 Trailer मर्दानी-3 चा ट्रेलर रिलीज! राणी मुखर्जीची 'शिवानी शिवाजी रॉय' अवतारात खास एन्ट्री
Mardaani 3 Trailer Out : यशराज फिल्म्सने बहुप्रतिक्षित 'मर्दानी ३' (Mardaani 3) चा ट्रेलर रिलीज केला असून, सोशल मीडियावर या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दशकातील सर्वात यशस्वी महिला प्रधान फ्रँचायझी म्हणून ओळखली जाणारी 'मर्दानी' आता तिसऱ्या भागात अधिक क्रूर आणि सत्य घटनेवर आधारित थरार घेऊन येत आहे.

एका निडर पोलिस ऑफिसरचा थरारक प्रवास
अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी आणि गुन्हेगारांच्या काळजात धडकी भरवणारी 'शिवानी शिवाजी रॉय' पुन्हा एकदा परतली आहे. राणी मुखर्जीचा हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून समाजातील एका भीषण वास्तवाचा आरसा आहे. ज्या पद्धतीने ट्रेलरमध्ये बेपत्ता मुलींच्या केसचा छडा लावण्यासाठी शिवानी आपला जीव धोक्यात घालते, ते पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
'मर्दानी ३' का बघावा? ही आहेत २ प्रमुख कारणे
१. शिवानी शिवाजी रॉय विरुद्ध लेडी व्हिलन
या भागात प्रथमच राणी मुखर्जीचा सामना एका शक्तिशाली महिला खलनायकाशी होणार आहे. मल्लिका प्रसादने साकारलेली ही क्रूर खलनायिका आणि शिवानी यांच्यातील 'माईंड गेम्स' आणि अॅक्शन पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल.
२. सामाजिक वास्तवाचे दर्शन
'मर्दानी'च्या पहिल्या भागात मानवी तस्करी आणि दुसऱ्या भागात विकृत मानसिकतेच्या बलात्काऱ्याचा पर्दाफाश केला होता. आता तिसऱ्या भागात देशातील 'बेपत्ता होणाऱ्या मुलीं'च्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकण्यात आला आहे, जे प्रत्येक नागरिकाने पाहणे गरजेचे आहे.
प्रमुख माहिती..
- दिग्दर्शन: अभिराज मीनावाला
- लेखन: आयुष गुप्ता (द रेल्वे मेन फेम)
- कलाकार: राणी मुखर्जी, मल्लिका प्रसाद, जानकी बोडीवाला
- रिलीज डेट: ३० जानेवारी २०२६
ॲडव्हान्स बुकिंग कधी सुरू होणार?
३० जानेवारी २०२६ रोजी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने, त्याचे अधिकृत ॲडव्हान्स बुकिंग २५ जानेवारी २०२६ (रविवार) पासून देशभरातील सर्व मोठ्या मल्टिप्लेक्स (PVR-Inox, Cinepolis) आणि सिंगल स्क्रीनवर सुरू होण्याची शक्यता आहे.
यशराज फिल्म्सचा मोठा चित्रपट असल्याने, हा चित्रपट भारतात सुमारे ३००० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. ट्रेलरला अवघ्या काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाल्याने 'मर्दानी ३' बॉक्स ऑफिसवर मोठी ओपनिंग घेण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.












Click it and Unblock the Notifications