चित्रपटसृष्टीत शोककळा; 'या' अभिनेत्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह, मृत्यूच नेमकं कारण काय?

Malayalam Actor Kalabhavan Navas Death : मल्याळम चित्रपटसृष्टीतून अतिशय धक्कादायक व वेदना देणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मिमिक्री कलाकार आणि अभिनेते कलाभवन नवस यांचे शनिवारी, 2 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले. ते 51 वर्षांचे होते.

त्यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवस हे केरळमधील चोट्टनिक्कारा येथील एका हॉटेलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. नेमका त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Malayalam Actor Kalabhavan Navas

नेमके काय घडले?

'प्रकंबनम' चित्रपटाच्या शूटिंगसाठी कलाभवन नवस चोट्टनिक्कारा येथील हॉटेलमध्ये थांबले होते. 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता शूटिंग संपवून ते हॉटेलच्या खोलीत परतले होते.

रात्री 8 वाजेपर्यंत ते चेक आउट करतील असे त्यांनी सांगितले होते. ठरलेल्या वेळेत ते रिसेप्शनवर न पोहोचल्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला.

आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून उघडला. त्यावेळी कलाभवन नवस खोलीतील जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी काय सांगितले?

पोलिसांच्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या खोलीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. नवस यांचे मित्र आणि क्रू मेंबर्सनी सांगितले की, काही तासांपूर्वी ते अगदी ठीक होते आणि हसत-खेळत होते.

त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या, कलाभवन नवस यांचा मृतदेह कलामसेरी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

अभिनेत्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत शोककळा!

अभिनेता तथा कॉमेडी कलाकार कलाभवन नवस यांचा अचानक मृत्यू झाल्याने मल्याळम सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. कॉमेडी कलाकार तथा विविध नामवंत कलाकारांसोबत त्यांनी काम केलेले आहे. सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+