बॉलिवूड अभिनेत्री मलायकाच्या वडीलांची आत्महत्या, अनिल अरोरांनी 6 व्या मजल्यावरून मारली उडी
Malaika Arora Father Death : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हीच्या कुटुंबासंदर्भातील धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. मलायकाला पितृशोक झाला असून तिच्या वडीलांनी इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवले आहे. एवढं टोकाचं पाऊल त्यांनी का उचललं याबाबत अद्याप समोर आलेले नाही. परंतु या घटनेने बॉलिवूड जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठण्यात आलेला आहे. दरम्यान, आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल त्यांनी का उचललं याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेता अरबाज खान हा सध्या अरोरा कुटुंबासोबत असल्याची असल्याची माहिती देण्यात आली. अनिल अरोरा यांचे पार्थिव वांद्रे येथील डॉ. भाभा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेले आहे.
मलायका पुण्याहून मुंबईसाठी रवाना
अभिनेत्री मलायका अरोर सद्या पुण्यात होती. एका कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आलेली असल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईसाठी रवाना झाली. या घटनेची माहिती मिळताच अरोरा कुटुंबातील सदस्यांना धीर देण्यासाठी मलायकाचा पूर्व पती आणि अभिनेता अरबाज खान हा अरोरा यांच्या घरी दाखल झालेला आहे.
Watch: Actress Malaika Arora’s father, Anil Arora, died by suicide on Wednesday morning.
— IANS (@ians_india) September 11, 2024
It is reported that Anil Arora jumped from the terrace of a seven-storey building in Bandra, Mumbai, at around 9:00 AM pic.twitter.com/WshGXvffuM
अनिल अरोरा होते नेव्हीमध्ये नोकरीला
मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांचे कुटुंब भारताच्या सीमेवर वसलेल्या फाजिल्का येथील रहिवासी होते. अनिल अरोरा यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केले होते. अनिल अरोरा यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्पशी लग्न केले. मलायका 11 वर्षांची असताना अनिल अरोरा आणि जॉयस यांचा घटस्फोट झाला असल्याचे मलायकाने आपल्या एका सांगितले होते.
गेल्यावर्षी रुग्णालयात केले होते दाखल
गेल्या वर्षी मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांना काही कारणामुळे अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले होते. अभिनेत्रीला अनेकवेळा हॉस्पिटलबाहेर स्पॉट करण्यात आले होते. मात्र, त्याला कोणती समस्या भेडसावत होती, याबाबत कोणतीही विशेष माहिती मिळू शकली नाही. आता त्यांनी अचानक आत्महत्या केली आहे. पोलीस सध्या पुढील कारवाई करत आहेत.












Click it and Unblock the Notifications