Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'तो माझ्याकडे बघून डोळा मारत आहे, फ्लाइंग किस करत आहे', 16 वर्षाच्या तरुणावर संतापली मलायका अरोरा

Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने अभिनेता अर्जुन कपूरशी ब्रेकअप झाल्यापासून लोक तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक आहेत. सध्या मलायका अरोरा 'हिप हॉप इंडिया सीझन 2' या डान्स रिअॅलिटी शो चा जज म्हणून काम करताना दिसत आहे.

16 वर्षांच्या मुलावर संपापली मलायका अरोरा

या शोचा पहिला भाग 14 मार्च 2024 रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित झाला आहे. दरम्यान शोमध्ये आलेल्या एका 16 वर्षांच्या स्पर्धकावर मलायका अरोरा प्रचंड संतापली आहे. मलायकाने स्पर्धकाला त्याच्या आईचा नंबरही मागितला आहे.

Malaika Arora

'हिप हॉप इंडिया सीझन 2' च्या एका स्पर्धकाला मलायका अरोराने फटकारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते आहे की, उत्तर प्रदेशचा रहिवासी नवीन शाह शोसाठी ऑडिशन देण्यासाठी येतो.

'तो डोळा मारत आहे, फ्लाइंग किस करत आहे'

ऑडिशनसाठी आलेल्या या 16 वर्षीय स्पर्धाकाने शो यादरम्यान स्पर्धकाने मलायका अरोराकडे अनेक अश्लील हावभाव केले. यामुळे मलायका प्रचंड संतापली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मलायका अरोरा म्हणते- मला तुझ्या आईचा फोन नंबर दे. तिथे एक 16 वर्षांचा मुलगा आहे, तो डान्स करताना माझ्याकडे सरळ पाहत आहे, डोळा मारत आहे, फ्लाइंग किस करत आहे.

दरम्यान मलायका अरोराने फटकारल्यानंतर 16 वर्षीय स्पर्धक हसताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये इतर स्पर्धकही मलायकाच्या समर्थनार्थ बोलताना दिसत आहेत. या स्पर्धकाबद्दल इतर स्पर्धक त्या बद्दल बोलत आहेत. ते म्हणातात की, त्याला फटकारणे योग्य होते, हे सर्व करण्याचे त्याचे वय काय आहे आणि तो हे सर्व कोणासमोर करत आहे.

मलायका अरोराचे प्रोजेक्ट्स

मलायका अरोरा 'जरा नचके दिखा' सारख्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसली आहे. 2010 मध्ये तिने 'झलक दिखला जा' आणि 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्ये जज म्हणून काम केले आहे. याशिवाय ती 2019 मध्ये एमटीव्ही 'सुपरमॉडेल ऑफ द इयर' ची जज आणि होस्ट देखील राहिली आहे.

2020 मध्ये मलायका अरोराने 'इंडियाज बेस्ट डान्सर' या शोचे जज म्हणून काम केले आहे. अलिकडेच मलायकाने तिचा मुलगा अरहान खानसोबत मुंबईत 'स्कार्लेट हाऊस' नावाचे एक आलिशान रेस्टॉरंट उघडले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+