'रईस'मध्ये दिसलेल्या महिरा खानची भारतविरोधी मानसिकता दिसली; पहलगाम हल्ल्यानंतर पोस्ट केली, नंतर...
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. जगभरातून या घटनेची निंदा करण्यात आली. सामान्य जनतेपासून ते चित्रपटातील कलाकारांपर्यंत सर्वजण आपला राग व्यक्त केला. पाकिस्तानी सेलिब्रिटी देखील या घटनेवर उघडपणे दुःख व्यक्त करत दिसले. अबीर गुलाल फेम अभिनेता फवाद खानने या दहशतवादी हल्ल्यानंतर राग व्यक्त केला होता. त्यानंतर शाहरुख खानसोबत काम केलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खाननेही एक पोस्ट शेअर केली. परंतु २४ तासांच्या आत ती पोस्ट डिलिट केल्याने पुन्हा चर्चा वाढल्या.

काय म्हणाली होती महिरा?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर महिरा खान काहीच बोलली नसल्याने चर्चा सुरु झाल्या होत्या. कारण महिरा खानने शाहरुख खानसोबत 'रईस' या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. परंतु, उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना हिंदी चित्रपटसृष्टीत बंदी घालण्यात आली. महिराने भारतात काम केले असल्याने या हल्ल्यानंतर तिने काहीतरी बोलावे, अशी तिच्या चाहत्यांची अपेक्षा होती. अखेर महिराने दुसऱ्या दिवशी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली. त्यामध्ये माहिरा खान म्हणाली, "जगात कुठेही, कोणत्याही स्वरूपात किंवा स्वरूपात होणारी हिंसाचार ही भ्याडपणाची निशाणी आहे. पहलगाममधील हल्ल्यात प्रभावित झालेल्या सर्वांबद्दल माझी संवेदना."
पोस्ट लगेच केली डिलिट
महिराने ही पोस्ट केल्यानंतर तिच्या चाहत्यांना जरा बरे वाटले. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण २४ तासांच्या आत महिराने ही पोस्ट डिलिट केली. आता ही पोस्ट तिने का डिलिट केली, हे मात्र समजले नाही. परंतु पाकिस्तानी कलाकारांची ही धरसोड वृत्ती चांगलीच चर्चेत आली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामधील अंतर पुन्हा एकदा वाढले आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानी सेलिब्रिटी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्यानंतर पुन्हा यू-टर्न घेतल्याने नाराजी वाढली.
फवाद खान काय म्हणाला?
या हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खाननेही शोक व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली. "पहलगाममधील हल्ल्याबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले आहे. या भयानक घटनेतील बळींसोबत आमचे विचार आणि प्रार्थना आहेत आणि या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबियांना शक्ती आणि उपचार मिळावेत अशी प्रार्थना करतो," असे त्यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले होते. खरंतर, फवाद खान ९ वर्षांनंतर बॉलिवूड चित्रपटांमधून पुनरागमन करणार होता. वाणी कपूरसोबतचा त्यांचा 'अबीर गुलाल' हा चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु आता हल्ल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही.












Click it and Unblock the Notifications