mahavatar narsimha : महावतार नरसिम्हा OTTवर रिलीज; घरबसल्या बघा मुव्ही, सिनेमाच्या 5 खास गोष्टी वाचा
Mahavatar Narsimha OTT Release : महावतार नरसिम्हा २५ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला, या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. यानंतर या चित्रपटाची प्रचंड हवाही झाली. आपल्या जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्स आणि दमदार कथेने नरसिम्हा अॅनिमेटेड फिल्मने प्रेक्षकांची मने जिंकली. आता, ५६ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ही ब्लॉकबस्टर फिल्म थेट तुमच्या घरी पाहता येणार आहे.
अश्विन कुमार दिग्दर्शित आणि क्लीम प्रोडक्शंस व होम्बले फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेली ॲनिमेटेड फिल्म 'महावतार नरसिम्हा' आता ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता ही फिल्म तुम्हाला ओटीटी प्लॅटफाॅर्मवर पाहायला मिळणार आहे. आज ही फिल्म ओटीटी प्लॅटफार्मवर रिलिज झाली आहे.

ओटीटीवर कधी आणि कुठे पाहता येईल?
'महावतार नरसिम्हा' हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजल्यापासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यासाठी उपलब्ध झाला आहे. नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. ज्यांनी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्याची संधी गमावली होती, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
उत्कृष्ट कमाईसह बनला ब्लॉकबस्टर
या चित्रपटाची कथा भगवान विष्णूंचे परमभक्त प्रल्हाद आणि राक्षस राजा हिरण्यकश्यपू यांच्यावर आधारित आहे. जेव्हा हिरण्यकश्यपूने अत्याचाराची मर्यादा ओलांडली, तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार धारण करून आपल्या भक्ताचे रक्षण केले आणि दुष्टाचा अंत केला.
नरसिम्हा चित्रपटाच्या 5 खास गोष्टी
1. नुकताच ओटीटीवर आलेला 'महावतार नरसिम्हा' हा चित्रपट याच पौराणिक कथेवर आधारित आहे, जो आधुनिक ॲनिमेशन आणि शक्तिशाली व्हिज्युअल इफेक्ट्सने सादर करण्यात आला आहे.
2. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे, त्याने पारंपरिक कथेशी एकनिष्ठ राहूनही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्यामुळे लहान मुलांनाही ही कथा समजून घेणे सोपे झाले आहे.
3. सामान्यतः धार्मिक कथांवर आधारित चित्रपट कमी बजेटचे असतात, पण 'महावतार नरसिम्हा'ने 250 कोटींहून अधिक कमाई करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
4. त्यामुळे, हा चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही, तर पौराणिक कथा आणि आधुनिक चित्रपट निर्मितीचा संगम साधून धार्मिक विषयावरही ब्लॉकबस्टर चित्रपट बनवता येतो, हे या चित्रपटाने दाखवून दिले आहे.
5. उत्कृष्ट ॲनिमेशन, दमदार बॅकग्राउंड म्युझिक आणि भावपूर्ण कथेमुळे या चित्रपटाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'महावतार नरसिम्हा'ने जगभरात 325.65 कोटी रुपयांची कमाई केली, तर भारतीय बॉक्स ऑफिसवर 250.2 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर ॲनिमेटेड चित्रपटांपैकी एक बनला आहे.












Click it and Unblock the Notifications