खान सर यांच्या पत्नीची पहिली झलक! स्वागत समारंभात जोडीने स्टेजवर एंट्री, पाहा खास क्षण

शिक्षणाच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारे आणि देशभरात लोकप्रिय ठरलेले खान सर यांनी नुकताच विवाह केला असून, त्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन पटणा शहरात मोठ्या थाटात करण्यात आले. या सोहळ्याची खास आकर्षण ठरली - त्यांची पत्नी. या समारंभात पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसलेल्या 'मिसेस खान' यांची झलक पाहण्यासाठी सर्वत्र उत्सुकता होती.

Khan Sir wife

समारंभ शगुना मोड येथील एका भव्य बँक्वेट हॉलमध्ये पार पडला. रंगीबेरंगी लाइट्स, फुलांनी सजवलेला स्टेज आणि शिस्तबद्ध व्यवस्था - सर्व काही अगदी दिमाखदार होते. खान सरांनी पत्नीचा हात धरत स्टेजवर प्रवेश केला. स्टेजवर चढताना त्यांनी पत्नीला आधार दिल्याचे दृश्य उपस्थित पाहुण्यांच्या मनात भरले.

खान सरांची पत्नी ए.एस. खान यांनी पारंपरिक लाल लेहंगा, घुंघट आणि भरजरी दागिन्यांसह उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे अत्यंत शालीन आणि सोज्वळ रूप पाहून अनेकांचे डोळे थक्क झाले. शांत, सौम्य आणि विनम्र स्वभावामुळे त्या लगेचच सर्वांच्या मनात घर करून गेल्या.

या समारंभात खान सरांनी पाहुण्यांसाठी जेवणाची भव्य व्यवस्था केली होती. स्टार्टरमध्ये गोलगप्पे, चाट आणि विविध झणझणीत पदार्थ होते. मुख्य भोजनामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी मिळून जवळपास २४५ पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. रसगुल्ला, गुलाबजाम, खीर व आईस्क्रीमसारख्या गोड पदार्थांनी जेवणाची सांगता झाली.

या सोहळ्यात देशभरातून आलेले शिक्षक, यूट्यूबवरील शैक्षणिक चॅनेल्सचे तज्ज्ञ, मित्रपरिवार आणि काही राजकीय नेतेही उपस्थित होते. पीडब्ल्यूचे अलख पांडे, हिमांशी मॅम, नीतू मॅम, गगन प्रताप सर, आदित्य रंजन, रौशन आनंद आणि एस. के. झा यांच्यासह अनेकांनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या.

खान सर यांच्या पत्नी बिहारमधील सिवान जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांचे शिक्षण आयसीएसई बोर्डातून झाले आहे. त्यांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःला घडवले आहे. त्यांचा स्वभाव शांत, सुसंस्कृत आणि समंजस असल्याचे सांगितले जाते.

हा रिसेप्शन सोहळा केवळ खान सरांच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात नव्हे, तर त्यांच्या चाहत्यांसाठीही एक भावनिक क्षण ठरला. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+