Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

KBC 2025: भाग्य फळफळलं, केबीसीच्या 'या' सीजनला मिळाला पहिला करोडपती! जाणून घ्या कोण आहे? बघा व्हिडिओ

KBC 2025 : दिग्गज अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन होस्टींग करत असलेल्या सोनी टीव्हीचा प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपती सीजन -17 ला पहिला करोडपती मिळाला आहे. या करोडपती स्पर्धकाचे भाग्य फळफळले आहे. सोनी टीव्हीने एक्सवरील आपल्या अधिकृत अकाऊंटमध्ये या सीजनच्या करोडपतीबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आह.

सोनी टीव्हीचा प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' (KBC) हा लोकप्रिय कार्यक्रम रसिकांना खिळवून ठेवणार आहे, एवढेच नाही तर हा शो केवळ मनोरंजनच करत नाहीतर ज्ञानातही भर घालतो. या कार्यक्रमाच्या क्विझ शोमध्ये प्रवेश मिळवणारा प्रत्येक स्पर्धक क्विझ शो ची वाट पाहत असतो. तूर्त 1 कोटी जिंकण्याबद्दल वृत्त असे आहे की, KBC 2025 ला पहिला करोडपती मिळाला आहे.

KBC 2025 Kaun Banega Karodpati Season 17 Aditya Kumar

कोण आहे केबीसी-17 चा पहिला करोडपती?

उत्तराखंडचा आदित्य कुमार या सीझनचा पहिला करोडपती बनला आहे, जो आता शोमध्ये 7 कोटींचा प्रश्न खेळणार आहे. आदित्य कुमारचा व्हिडिओ सोनी टीव्हीच्या अधिकृत X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 'बिग बी' आदित् कुमारच्या करोडपती होण्याची घोषणा करताना दिसत आहेत. या क्लिपमध्ये आदित्य 16 वा प्रश्न खेळताना दाखवला आहे, आता तो 7 कोटी जिंकू शकेल की नाही हे शो पाहिल्यानंतरच कळेल पण या क्लिपने लोकांना पुन्हा एकदा शोचे वेड लावले आहे यात शंका नाही.

कोण आहे आदित्यकुमार?

आदित्य कुमार हे नरसन उत्तराखंडचा रहिवासी आहेत. विद्यार्थी दशेपासून ते केबीसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छूक होते. सोनी टीव्हीच्या एक्सवरील व्हिडिओत अमिताभ बच्चन आदित्यकुमार करोडपती झाल्याची घोषणा करताना दिसतात आणि त्यानंतर ७ कोटींसाठी प्रश्न विचारताना दिसत आहेत. हा प्रश्न विचारल्यानंतर आदित्य कुमार यांना अमिताभ बच्चन रिस्क घ्याल का असे विचारतात आणि आदित्यकुमारही हो असे उत्तर देतात म्हणजेच आता पुढे काय हेही लवकरच कळेल.

या क्लिपमध्ये आदित्य कु्मार सांगत आहेत की, ते त्यांच्या कॉलेजच्या दिवसांपासून केबीसीमध्ये येण्याचे स्वप्न पाहत होते. कॉलेजच्या काळात त्याने त्याच्या मित्रांना सांगितले होते की 'त्याची केबीसीसाठी निवड झाली आहे. त्याच्या मित्रांनी व्हिडिओ शूटसाठी नवीन कपडेही खरेदी केले होते पण नंतर मी एका आठवड्यानंतर त्यांना सांगितले की ते खोटे आहे आणि आता जेव्हा माझी निवड झाली तेव्हा मी माझ्या मित्रांना सांगत होतो, तेव्हा कोणीही त्यावर विश्वास ठेवत नव्हते. अधिक वाचा:

किती प्रश्नानंतर मिळतात सात कोटी

तसे पाहता केबीसीमध्ये १६ प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर सात कोटी मिळतात. जॅकपॉटची रक्कम अजूनही ₹७ कोटी आहे. यात ५ प्रश्नांनंतर, एक कोटी किमतीचा प्रश्न येतो. यावेळी एक नवीन जीवनरेखा 'संकेत सूक्त' समाविष्ट करण्यात आली आहे, ज्यामध्ये स्पर्धकांना प्रश्नासाठी एक संकेत दिला जातो. पूर्वी पात्रता प्रश्नावर एक हजार दिले जात होते, यावेळी ते ५ हजार झाले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+