Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कार्तिक आर्यन या अभिनेत्रीला करतोय डेट? अभिनेत्याच्या आईचा जाहीर खुलासा, म्हणाली - 'आमची भावी सून"

kartik aaryan : बाॅलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनसोबत त्याची आई माला तिवारी आयफा पुरस्कार 2025 मध्ये सहभागी झाली होती. या सोहळ्यात कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यनच्या आईला त्यांच्या भावी सुनेबद्दल विचारण्यात आले होते. कार्तिक आर्यनच्या आईने आपल्याला अपेक्षित असलेली सून कशी हवी हे सांगून टाकले.

माला तिवारी म्हणाल्या, "सून खूप चांगली डॉक्टर असावी, अशी कुटुंबाची मागणी आहे." त्यांच्या या वक्तव्यानंतर लोकांनी अंदाज व्यक्त केला की, त्यांनी कार्तिक आणि श्रीलीला यांच्या नात्याबाबत तर हिंट
दिली नाही ना..?

kartik aaryan

श्रीलीला डाॅक्टर बनण्याच्या तयारीत

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला देखील डॉक्टर बनण्याच्या तयारीत आहे. कार्तिक आणि श्रीलीला यांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही वक्तव्य दिलेले नसले तरी कार्तिकच्या आईच्या या विधानाने अफवांना आणखी खतपाणी घातले आहे.

OneIndia Hindi नुसार, कार्तिक आर्यन आणि त्याच्या कुटुंबाने त्याची बहीण डॉ. कृतिका तिवारीने तिच्या वैद्यकीय कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड गाठल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टीचे आयोजन केले होते. या उत्सवात श्रीलीलाही सहभागी झाली होती. एका व्हिडिओमध्ये असे दिसून आले की, पार्टीदरम्यान श्रीलीला 'पुष्पा 2'मधील 'किसिक' गाण्याचे हुक स्टेप करत होती, तर कार्तिक तिच्या मागे उभा राहून व्हिडिओ बनवत होता.

कार्तिक-श्रीलीला एकत्र चित्रपटात झळकणार

विशेष म्हणजे, कार्तिक आर्यन आणि श्रीलीला लवकरच अनुराग बसू दिग्दर्शित चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. दोघे एकत्र स्क्रिन शेअर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी रिलीज झालेल्या टीझरमध्ये कार्तिकला स्टेजवर 'तू मेरी जिंदगी' गाणे गाताना दाखवण्यात आले होते, ज्यामध्ये तो लांब केस आणि दाढी असलेला गंभीर प्रियकर म्हणून दिसत होता. व्हिडिओमध्ये श्रीलीला आणि कार्तिकची रोमँटिक झलकही दाखवण्यात आली, ज्यामुळे चाहत्यांना त्यांच्या नव्या जोडीच्या जबरदस्त केमिस्ट्रीची कल्पना आली. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट यंदाच्या दिवाळीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+