Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सिद्धु मुसेवाला, सलमान खाननंतर कपिल शर्माला सतावतेय 'ही' डेंजर गँग! कॅप्स कॅफेवर केली फायरिंग

Kapil Sharma's Caps Cafe Attack : कॅनडातील सुरै शहरात कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा याच्या कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ढिल्लन आणि बिष्णोई गँगने स्वीकारण्याची माहिती समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या महिन्यात कपिल शर्माच्या याच कॅफेवर हल्ला झाला होता, त्यानंतर ही दुसरी घटना घडली असून सलमान खान आणि सिद्धू मुसेवालानंतर आता कपिल शर्माला बिष्णोई गँग टार्गेट करत असल्याचे बोलले जात आहे.

Kapil Sharma s Caps Cafe Attack

मुंबईतील कॅफेवर हल्ल्याची धमकी

मीडिया रिपोर्ट नुसार हल्लेखोरांनी कॅनडानंतर मुंबईतील कपिल शर्माच्या कॅफेवर हल्ल्याची धमकी दिली आहे. या संदर्भात त्यांनी एक पोस्ट केली असून 'जय श्रीराम' या नावाने पोस्टची सुरुवात केली आहे. सगळ्या भावांना रामराम असे म्हणत कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या हल्ल्याची आम्ही जबाबदारी घेत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. ही पोस्ट व्हायरल झालेली आहे, यामध्ये "याला आम्ही फोन केला होता, पण याने ऐकले नाही म्हणून कारवाई करावी लागली. ..तर पुढची कारवाई लवकरच मुंबईत करू" अशी धमकीही त्यांनी दिली आहे.

कपिल शर्माच्या कॅफेवर कसा झाला हल्ला?

कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला. यावेळी 6 राऊंड फायर करण्यात आले, मात्र या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही असे वृत्त आहे. या घटनेनंतर सुरै पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एका महिन्यातच कॅफेवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. मागच्या प्रकरणातही गोळीबार झाला होता. तेव्हा कोणालाही अद्यापपर्यंत अटक झालेली नाही.

मागच्या महिन्यात कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर हल्ला झाला होता आणि हा हल्ला मध्यरात्री करण्यात आला होता. दरम्यान या हल्ल्याचा व्हिडिओ हल्लेखोरांनी जारी केला होता. त्यानंतर दहा दिवसांनी हा कॅफे परत सुरू करण्यात आला होता. त्यावेळी या हल्ल्याची जबाबदारी 'बब्बर खालचा इंटरनॅशनल'चा कार्यकर्ता आणि भारतातील वाँटेड हरिजित सिंह लाडी याने स्वीकारली होती.

हल्ल्याची जबदारी घेत केलेली पोस्ट काय?

"जय श्री राम.. सत्श्रीकाल... आज सर्व भावांना, राम राम. कपिल शर्माच्या सरै येथील कॅप्स कॅफेमध्ये झालेल्या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ढिल्लन आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीची आहे. आम्ही त्याला फोन केला पण त्याने रिंग ऐकली नाही, म्हणून आम्हाला कारवाई करावी लागली, जर त्याला आता रिंग ऐकू आली नाही तर आम्ही लवकरच मुंबईत पुढची कारवाई करू.." अशी पोस्ट गोल्डी ढिल्लन या अकाऊंटवरुन करण्यात आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+