Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Kantara chapter 1 : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा चॅप्टर 1' चा ऐतिहासिक धमाका! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई

Kantara chapter 1 box office collection day : अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कांतारा: चॅप्टर १' ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई करून सर्वांना चकित केले आहे. २०२२ च्या 'कांतारा' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हा प्रीक्वल असून, २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा आणि गांधी जयंतीच्या सुट्ट्याच्या दिवशी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला.

पहिल्या दिवशी किती केली कांतारा चॅप्टर १ ने कमाई?

बॉक्स ऑफिस ट्रॅकिंग पोर्टल Sacnilk च्या प्राथमिक अंदाजानुसार, 'कांतारा: चॅप्टर १' ने पहिल्याच दिवशी भारतात सुमारे ₹ ६० कोटी (नेट) कमाई केली आहे. हा आकडा दर्शवतो की, देशभरातील प्रेक्षकांनी या पौराणिक आणि लोककथांवर आधारित चित्रपटाला तुफान प्रतिसाद दिला आहे.

Kantara chapter 1 box office collection day

भाषिक कमाईचा मोठा वाटा

या चित्रपटाची कमाई केवळ एका भाषेपुरती मर्यादित नसून, विविध भाषांमध्ये झाली आहे. 'कांतारा: चॅप्टर १' ने मिळवलेल्या ₹६० कोटींच्या कमाईचे भाषिक विभाजन खालीलप्रमाणे आहे.

Take a Poll

भाषा पहिल्या दिवसाची अंदाजित कमाई (कोटींमध्ये)

  • हिंदी ₹ १९.५ कोटी
  • कन्नड ₹ १८ कोटी
  • तेलुगू ₹ १२.५ कोटी
  • तमिळ ₹ ५.२५ कोटी
  • मल्याळम ₹ ४.७५ कोटी

हिंदी भाषेतील ₹१९.५ कोटींची कमाई विशेष लक्षवेधी आहे, ज्यामुळे या चित्रपटाला देशभरात मिळालेल्या प्रचंड स्वीकृतीची कल्पना येते.

काय आहे कांताराची कथा?

होम्बळे फिल्म्स निर्मित आणि विजय किरागंदूर व चलुवे गौडा निर्मित 'कांतारा: चॅप्टर १' ची कथा कदंब राजघराण्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. एका आदिवासी समुदायाला वाचवलेला मुलगा बर्मे (ऋषभ शेट्टी) आणि त्याचे राजकीय संघर्ष, अलौकिक शक्ती आणि पवित्र विधींमध्ये गुंतलेले आयुष्य यात दाखवले आहे. हा चित्रपट केवळ ऐतिहासिक कथा नसून, मानव, निसर्ग आणि श्रद्धा यांच्यातील गुंतागुंतीचे नाते दर्शवणारा आहे.

या चित्रपटात ऋषभ शेट्टीसोबत रुक्मणी वसंत (कनकावती), गुलशन देवय्या (कुलशेखरा) आणि जयराम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पहिल्या दिवसाच्या या दणदणीत यशानंतर, आगामी विकेंडमध्ये हा चित्रपट आपला हा प्रारंभिक वेग कसा कायम ठेवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कांतारा चॅप्टर - १, कि पाईंट्स

  • कुलशेखरच्या भूमिकेत गुलशन देवय्या आणि राजकुमारी कनकवल्लीच्या भूपात रुक्मणी वसंत यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रभावित करतो. जयराम यांचा कांताराच्या जंगलाचा भीती आणि क्लायमॅक्समधील अवतार खूपच सटीक आहे.
  • अजनीश लोकनाथ यांचे संगीत, जे कांतारातील लोकांच्या वेदनांना मधुर बनवते, ही चित्रपटाची सर्वात मोठी ताकद आहे. वाघाचे आणि देवांगणांचे दृश्य हॉलीवूडच्या स्तराचे आहेत.
  • ऋषभ शेट्टीचा खोडकर अंदाज आणि नंतर महाकाली देवीच्या रूपातील अभिनय या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवणार आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांनी कथा सांगण्यात आणि दृश्यांची मांडणी करण्यात अद्भुत काम केले आहे.
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+