कंगनाला मुंबईतील बंगला का विकावा लागला? अभिनेत्रीने सांगितले धक्कादायक कारण
Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनाचा 'इमर्जन्सी' चित्रपट वादांमुळे प्रदर्शित होत नाहीये. दरम्यान, तिला मुंबईतील बंगलाही विकावा लागला आहे.
कंगना राणौतने नुकताच तिचा मुंबईतील 32 कोटींचा बंगला विकला होता. ज्यामध्ये अभिनेत्रीचे स्वतःचे ऑफिस देखील होते. हा तोच बंगला आहे ज्यावर बीएमसीचा बुलडोझरही चालला आहे. अशा परिस्थितीत कंगनाने आता तिला बंगला का विकावा लागला. याबाबत एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे
'या' कारणामुळे मुंबईतील बंगला विकावा लागला
न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौत म्हणाली, 'माझा चित्रपट रिलीज होणार होता. या चित्रपटासाठी मी माझी सर्व वैयक्तिक मालमत्ता गुंतवली होती. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. असो, मालमत्ता फक्त संकटकाळासाठी असते.

कंगनाने बंगला कधी खरेदी केला?
कंगना राणौतचे हे घर मुंबईतील पॉश भागातील वांद्रे येथील पाली हिल येथे आहे. कंगनाने 2017 मध्ये 20 कोटी रुपयांना मालमत्ता विकत घेतली आणि 2019 मध्ये तिचे मणिकर्णिका फिल्म्सचे कार्यालयही तेथे उघडले. काही भाग अनधिकृत बांधकामाचा असल्या कारणाने एका वर्षानंतर, 2020 मध्ये बीएमसी ने बंगला बुलडोझर केला. मात्र, या पाडकामावरूनही बराच वाद झाला. पण आता अभिनेत्रीने अखेर हा बंगला विकला आहे.
कंगना राणौतचा वर्क फ्रंट
कंगना राणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटासाठी चर्चेत आहे. गेल्या वर्षभरात या चित्रपटाची रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता मात्र प्रमाणपत्राअभावी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकला नाही. मात्र, या चित्रपटाच्या पुढील प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कंगना 'इमर्जन्सी' चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारताना दिसणार आहे.












Click it and Unblock the Notifications