कंगना रणौतच्या घराच्या लाईट बिलाचा दावा खोटा, कंपनीने सांगितले सत्य
Kangana Ranaut : बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौत आपल्या बिनधास्त अंदाजासाठी खास ओळखली जाते. अभिनेत्री आणि राजकारणी बनलेली कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथे जनता दरबारात लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यक्रम आयोजित करते असते. या कार्यक्रमातून ती सार्वजनिक समस्या आणि त्यांच्याशी संबंधित मुद्दे मांडते.
यावेळी कंगनाने अलीकडेच हिमाचल प्रदेशातील तिच्या मतदारसंघात एक राजकीय कार्यक्रम आयोजित केला होता. त्याठिकाणी तिने तिच्या घराच्या वीज बिलाबद्दल भाष्य करत जास्त बिलासाठी हिमाचल प्रदेश सरकारवर टीका केली.

हिमाचल प्रदेश येथे एका कार्यक्रमात कंगनाने मनाली येथील तिच्या घराचे 1 लाख रुपये वीज बिल आल्याबद्दल तिने भाष्य केलं आहे. कंगना म्हणाली की,तिच्या मनाली येथील खाली घराचे लाईट बिल 1 लाख रुपये आले आहे. घराच्या लाईट बिलाबद्दल बोलताना कंगना म्हणाली की, ज्या घरात मी राहत ही नाही, अश्या घराचे हे लाईट बिल आहे. त्यामुळे मला आश्चर्य वाटते की, ही रक्कम इतकी मोठी कशी असू शकते. या मुद्यावरुन कंगनाने काँग्रेस सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला केला आहे.
वीज कंपनीकडून कंगनाचे आरोपाचे खंडन
कंगनाच्या आरोपानंतर वीज कंपनींने स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीने कंगनाने केलेले आरोप खोडून काढले आहेत. कंपनीने म्हटलं आहे की, 90,384 रुपयांचे बिल हे एक महिन्याचे नसून दोन महिन्यांचे आहे, ज्यामध्ये त्यांचे जुने देणी देखील समाविष्ट आहेत. कंगना राणौतला 22 मार्च रोजी वीज बिल देण्यात आले. यामध्ये 32,287 रुपयांची प्रलंबित रक्कम देखील समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत मार्चमध्ये प्रलंबित देणीसह एकूण 90,384 रुपयांचे बिल जारी करण्यात आले आहे. कंपनीने म्हटलं आहे की की, त्यांच्या घराचा कनेक्टेड लोड 94.82 किलोवॅट आहे, जो सामान्य घराच्या इलेक्ट्रिकल लोडपेक्षा 1500 टक्के जास्त आहे.
कंगना राणौतचा आगामी प्रॉजेक्ट
कंगना राणौतच्या आगामी प्रॉजेक्ट बोलायचं झाले तर अभिनेत्री तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटासाठी चर्चेत आहे. गेल्या वर्षभरात या चित्रपटाची रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता, मात्र प्रमाणपत्राअभावी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकला नाही. मात्र, या चित्रपटाच्या पुढील प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कंगना 'इमर्जन्सी' चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारताना दिसणार आहे.












Click it and Unblock the Notifications