'आशिकी' चित्रपटातून या अभिनेत्रीला मिळाली ओळख, एका अपघाताने सर्व काही हिरावून घेतले
बॉलीवूड जगतात 90 च्या दशकात आशिकी हा रोमँटिक चित्रपट बनला होता, ज्या चित्रपटांची गाणी लोकं आजही गुणगुणतात.गाणी सुपर डुपर हिट झाली आणि चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाचा रिमेक आणि आशिकी-२ या गाण्यांनाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
आशिकी या सुप्रसिद्ध चित्रपटातून नावारुपास आलेली अभिनेत्री म्हणजे अनु अग्रवाल. अपघातानंतर अनु अग्रवालचे सर्व आयुष्य पालटून गेले. जाणून घेऊयात कसा आहे अनु अग्रवालचा प्रवास.

अनु अग्रवालला आशिकी चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली पण आज ती अनामिक जीवन जगत आहे. आपल्या साधेपणाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश केला आणि इंडस्ट्रीत आपला दबदबा निर्माण केला.
अनु अग्रवाल दिल्ली विद्यापीठातून सामाजिक शास्त्राचे शिक्षण घेत होती. यावेळी महेश भट्ट यांनी तिला त्यांच्या 'आशिकी' चित्रपटात पहिला ब्रेक दिला. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला, अभिनेत्री अनु अग्रवालला वेगळी ओळख मिळाली. यानंतर तिने अनेक चित्रपट (गजब तमाशा, खलनायक, किंग अंकल आणि कन्यादान इ.) केले. या चित्रपटांना मात्र एवढी प्रसिद्धी मिळाली नाही.
एक अपघाताने बदलून टाकले आयुष्य
बॉलीवूडनंतर अभिनेत्रीने साऊथ इंडस्ट्रीतही काम केले पण यश मिळाले नाही. 1996 नंतर अनु अग्रवालने फिल्मी जग सोडले आणि योग आणि अध्यात्माचा मार्ग स्विकारला. पण नशिबी काहीतरी वेगळंच घडायचं होतं. 1999 मध्ये झालेल्या दुःखद अपघाताने अनु अग्रवालकडून सर्व काही हिरावून घेतले.
रस्ता अपघातामुळे ती 29 दिवस कोमात राहिली, तिची स्मरणशक्ती गेली आणि अर्धांगवायूही झाला. डॉक्टरांच्या सल्ल्याने जवळपास ३ वर्षांनी अनु अग्रवालची स्मरणशक्ती काहीशी परत आली. प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिने आपली सर्व मालमत्ता दान करत संत बनण्याचा निर्णय घेतला.
आपल्या आयुष्यातील वेदनादायक घटनेतून बाहेर पडण्यासाठी अनु अग्रवाल बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात राहण्यास गेली. येथे तिने जगातील प्रसिद्ध योगसाधना केंद्रात आश्रय घेतला. अनु अग्रवालनुसार, मी कोण आहे, मी कुठून आहे, माझे नाव काय आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे योग केंद्रात वेळ घालवल्यानंतर मिळाल्याचं अनु अग्रवाल सांगते.
अनु अग्रवालनुसार तिला योग साधना केंद्र (बिहार, मुंगेर) येथे जीवनातील न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.अनु अग्रवालचा बॉलीवूड ते योग केंद्रापर्यंतचा प्रवास हार्परकॉलिन्सने 'असामान्य: मेमोयर ऑफ अ गर्ल हू केम बॅक फ्रॉम डेड' म्हणून प्रकाशित केला होता.












Click it and Unblock the Notifications