'तो मानवी रुपातील सैतान'; लेखक जावेद अख्तर यांच्यावर कोणी केली घणाघाती टीका, नेमका वाद काय?

Javed Akhtar Row : प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांच्या विरोधात जमियत उलेमा-ए-हिंदच्या कोलकाता युनिटने जोरदार निषेध केला आहे. त्यामुळे कोलकाता येथे होणारा उर्दू अकादमीचा चार दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

जमियतने जावेद अख्तर यांच्यावर इस्लाम आणि अल्लाहबद्दल 'आक्षेपार्ह विधाने' केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे अल्पसंख्याक समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

Javed Akhtar Row

उर्दू अकादमीने कार्यक्रम रद्द केला

पश्चिम बंगाल उर्दू अकादमीने 'हिंदी चित्रपटात उर्दू' नावाचा हा चार दिवसांचा कार्यक्रम पुढे ढकलल्याची घोषणा केली. हा कार्यक्रम रविवारपासून सुरू होणार होता. यामध्ये चर्चासत्र, कवी संमेलन (मुशायरा) आणि सांस्कृतिक सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात जावेद अख्तर यांना प्रमुख पाहुणे आणि मुशायराचे अध्यक्ष म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, अकादमीने हा निर्णय का घेतला याचे अधिकृत कारण दिलेले नाही.

जमियतचा तीव्र विरोध

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, जमियत उलेमा-ए-हिंदच्या कोलकाता युनिटने उर्दू अकादमीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात संघटनेचे सरचिटणीस झियाउल्ला रहमान यांनी जावेद अख्तर यांना 'मानवी रूपातील सैतान' म्हटले आहे.

तसेच, जावेद अख्तर यांना या कार्यक्रमात सहभागी करू नये, अशी मागणी केली आहे. त्यांनी पत्रात असेही म्हटले आहे की, उर्दू जगात अनेक चांगले कवी, लेखक आणि पत्रकार आहेत, ज्यांना आमंत्रित केले जाऊ शकते.

शबनम हाश्मी यांचे समर्थन

या वादाच्या पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्त्या शबनम हाश्मी (प्रसिद्ध नाट्य कलाकार सफदर हाश्मी यांची बहीण) जावेद अख्तर यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत.

त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, त्या स्वतः कोलकात्यात जावेद अख्तर यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित करतील. 'हे थांबवण्याची हिंमत कोणामध्ये आहे, ते पाहूया,' असे आव्हानही त्यांनी दिले.

जावेद अख्तर हे त्यांच्या बेधडक विधानांसाठी ओळखले जातात, ज्यामुळे अनेकदा वाद निर्माण होतो. कोलकाता येथील या घटनेमुळे आता साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर विचारसरणी आणि राजकारणाचा प्रभाव वाढत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+